क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

भावाने बहीणीच्या अंगावर गाडी घातली ! कन्नड तालुक्यातील कानडगावमधील घटना !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १५ – वडीलास मारहाण करू नको असे समजावून सागत असताना वाद झाला. या वादानंतर भावाने बहीणीच्या अंगावर दुचाकी घालून जखमी केल्याची घटना कन्नड तालुक्यातील कानडगाव येथे घडली.

सविता लक्ष्मण गोर्डे (वय 38 वर्षे, रा.ह.मु. पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर, मु. कानडगाव वेरुळ पोस्ट देवगाव रंगारी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सविता गोर्डे यांच्यावर ओरीयन सिटीकेयर सुपर सपरस्पेशॅलेटी हॉस्पिटल येथे उपचार चालू असून त्यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथ माहिती अहवालानुसार, दिनांक 12/04/2024 रोजी सकाळी 10.00 वाजेच्या सुमारास सविता गोर्डे यांच्या वडीलास त्यांचा भाऊ आनंद गोरखनाथ नांगुर्डे हा मारहाण करून शिवीगाळ करतो अशी मोबाईलव्दारे माहिती मिळाली.

त्यानंतर सविता गोर्डे या कानडगाव येथे भाऊ आंनद यास समजावण्यासाठी गेल्या असता भाऊ आंनद यास समजवत असताना त्याने सविता गोर्डे यांना शिवीगाळ करुन चापट बुक्याने मारहाण केली व वडीलास पण चापट बुक्याने मारहाण केली. त्यानंतर सविता गोर्डे या शाळेसमोरील कानडगाव येथील रस्त्यावर एका दगडावर बसलेल्या असताना आंनद गोरखनाथ नांगुर्डे यांनी त्यांची मोटार सायकल सविता गोर्डे यांच्या अंगावर घालून जखमी केल्याचे सविता गोर्डे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

याप्रकरणी सविता गोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंनद गोरखनाथ नांगुर्डे (रा. कानडगाव) यांच्यावर देवगांव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!