चौकात पोलिस नाही म्हणून सिग्नल मोडू नका अन्यथा मोबाईलवर अॅाटोमॅटिक येणार दंडाची पावती ! १७ जंक्शनवर पावरफुल CCTV बसवले; रोड रॉबरी, मंगळसूत्र चोरीवरही लगाम !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २० -: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोबाईलवर आता क्षणात एसएमस येणार असून दंडाची पावती धडकणार आहे. १७ जंक्शनवर CCTV लावण्यात आले असून केवळ दंड देणे हा उद्देश नसून रोड रॉबरी, मंगळसूत्र चोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडेकर यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २६/०१/२०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी छत्रपती संभाजीनगर शहर येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील महत्वाच्या १७ जंक्शनवर १२२ ANPR (Automatic Number Plate Recognition) कॅमेरे लावण्यात आलेले आहे. ते पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक विभागाच्या ई- चलान प्रणालीशी संलग्न होणार आहे. शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याव्दारे अॅटोमॅटीक फोटो काढून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येवून केलेल्या कारवाईची माहिती वाहन धारकास त्यांच्या मोबाईलवर संदेशव्दारे (SMS) काही मिनीटांतच माहिती मिळेल. यात विशेषत: सिग्नल जम्पिंग, स्टॉप लाईन, रॉग साईड, ट्रिपल सीट, विना हेल्मेट याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर अॅटोमॅटीक फोटो काढले जावून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
ANPR कॅमेरे (Automatic Number Plate Recognition) प्रणालीव्दारे ई-चलान देवून दंड वसूल करणे हा उद्देश नसून वाहतूकीला शिस्त लावणे हा मुख्य उद्देश आहे. जेणेकरुन सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याव्दारे करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे शहरातील नागरिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही. ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातास आळा बसेल.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
ज्या चौकामध्ये वाहतूक पोलिस नेमलेले नसेल अशा ठिकाणच्या वाहतुकीस सी. सी. टी. व्ही कॅमेरेव्दारे नियंत्रण करण्यात येईल. शहरात बसवण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही कॅमेऱ्यामुळे शहरातील कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे यांची माहिती मिळल्यावर तेथे तात्काळ वाहतूक नियंत्रण करता येईल. तसेच अपघात करून पळून जाणाऱ्या वाहन चालकास तात्काळ ताब्यात घेण्यास मदत होईल. सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यामुळे रोड रॉबरी, मंगळसूत्र चोरी, मोबाईल हिसकाविणे, इतर गुन्ह्यांना आळा बसेल. वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याव्दारे इतर मार्गावरून वाहतूक वळवून वाहतूक सुरळीत करता येईल.