हिमंत असेल तर घरात घुसून कपडे घेवून दाखवा, जावयाने सासूला धमकावले ! पिसादेवीच्या दोघांवर गुन्हा दाखल !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १२ – विवाहिता व तिची आई कपडे घेण्यासाठी गेल्या असत्या जावयाने सासूला धमकावले. हिंमत असेल तर घरात घुसून कपडे घेवून दाखवा अशी धमकी दिल्याचे सासूने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पिसादेवी येथील दोघांवर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांच्या दोन मुली पिसादेवी येथे एकाच घरात दिलेल्या आहेत. यातील एका मुलीचा सासरी वाद झाल्याने ती मागील आठ दिवसांपासून तिच्या लहान मुलीसह माहेरी राहाण्यासाठी आली होती. दि. 11/04/2024 रोजी दुपारी 12.30 वाजता विवाहिता तिच्या आईसह पिसादेवी येथे तिच्या सासरी नातीचे कपडे आणण्यासाठी गेल्या होत्या.
तेव्हा तेथे विवाहितेचा सासरा व सासु घरी होते. तेव्हा सदर विवाहिता सास-यस म्हणाली मला माझ्या व माझ्या लहान मुलीचे कपडे द्या कपड घेऊन मी परत जाणार आहे. परंतु त्यांनी कपडे देण्यास नकार दिल्याने विवाहिता व तिची आई दोघी परत घरी जाण्यास निघाल्या आसता रस्त्यामध्ये विवाहितेची पती भेटले व त्या दोघींना म्हणाले की मी तुम्हाला घरातून तुमचे कपडे देतो. त्यामुळे दोघी त्यांच्यासोबत परत दुपारी 03.00 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी गेल्या.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
घरी गेल्यावर जावई हे सासूला म्हणाले की, तुझ्यात हिमंत असेल तर आमच्या घरात घुसून कपडे घेऊन दाखव असे म्हणून सासूच्या हाताला धरून मला ढकलून दिले. यावेळी शिवीगाळही करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर विवाहितेच्या आईच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये विवाहितेच्या पतीवर व सासर्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.