क्राईमताज्या बातम्यामराठवाडा

विद्यार्थ्याला महाविद्यालयातच विष पाजले, चौघांनी हात पाय धरले तर दोघांनी विष पाजले ! बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ : डीएडच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यावर ६ जणांनी हल्ला चढवला. चौघांनी त्याचे हात पाय धरले तर दोघांनी त्याच्या तोंडात बळजबरी विषारी औषध पाजले. यानंतर तो विद्यार्थी बेशुद्ध पडला. ही खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील आष्टी येथील आध्यापक महाविद्यालयात घडली.

धनराज शिवाजी चखाले (वय 22, रा. चिखली ता. आष्टी जि. बीड) असे बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार घेतले. सध्या त्याची प्रकृती ठिक आहे. धनराज चखाले याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, तो आष्टी येथे आध्यापक महाविद्यालय येथे डी एड पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.

दिनांक 13/10/2023 रोजी फिर्यादी धनराज चखाले सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे राहते गाव चिखली येथून आष्टी येथे आध्यापक महाविद्यालय येथे आला. वर्गात नेहमी बसत असलेल्या एक नंबरच्या बेंचवर दप्तर ठेवले. तेव्हा तेथे दोघे ओळखीचे व इतर चार अनोळखी तेथे आले. दोघांनी बुक्क्याने मारहाण सुरु केली. धनराज चखाले त्यांना म्हणाला की, मी नेहमी येथे बसतो तुम्ही मला का मारता ? तेव्हा त्या दोघांनी पुन्हा मारहाण सुरु केली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

त्यानंतर अन्य चौघांनी धनराज चखाले याचे हाथ पाय धरले व ओळखीच्या दोघांनी विषारी औषधाची बाटली जबरदस्तीने तोंडात ओतली. त्यानंतर धनराज चखाले बेशुध्द पडला. ही घटना धनराज चखाले यांच्या वडीलांना कळताच वडीलांनी त्यास आष्टी येथील ग्रामीण रुग्नालय येथे दाखल केले तेथे प्राथमिक औषध उपचार करून पुढील औषध उपचारासाठी  सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल केले. तेथे धनराज चखालेवर ICUवार्डात उपचार घेतले.

सदर घटनेच्या आधी आठ दिवसांपूर्वीसुध्दा मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तेव्हा धनराज चखाले याने हा प्रकार कॉलेजच्या मॅडमला सांगितला होता. तेव्हा मॅडमणी त्यांना समजावून सांगितल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी धनराज चखाले याने दिलेल्या फिर्यादीवरून १) अजय गरुड २) अविस्कार जगताप यांच्यावर आष्टी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!