अशोक चव्हाणांचे कॉंग्रेसला धक्कातंत्र ! समर्थकांसह राजीनामा देत आज भाजपामध्ये प्रवेश !!
मुंबई, दि. १३ – माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण हे आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर सांगितले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यसमिती सदस्य पद (Member of Congress Working Committee), महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे सदस्यत्व आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
दरम्यान, कॉंग्रेसमधील अंतर्गत बंडाळी व मनमानीला कंटाळून चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात असले तरी कॉंग्रेसने मात्र ईडीच्या धाकाने चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनामान्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe