क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

तलाठ्याने दीड हजारांची लाच मागितली तर त्याच्या पंटरकडून RS दारूच्या क्वार्टरची मागणी ! शेतीचा फेर ओढण्यासाठी महसूल विभागाचा सुलतानी कारभार !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २६- शेत जमीनीचा फेर ओढण्यासाठी तलाठ्याने दोन हजार रुपये मागून दीड हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शवली तर त्याच्या पंटरने चक्क RS दारूच्या क्वार्टरची मागणी केली. याप्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

1.कैलास खंडुजी ढाकणे वय 56. वर्ष, तलाठी सजा निरखेडा , तहसील कार्यालय जालना. रा. रायगडनगर जालना. 2.सुदर्शन दादाराव वाडेकर वय 34 वर्ष व्यवसाय तलाठी यांचे खाजगी मदतनीस व शेती रा. जामवाडी ता.जि. जालना.( खाजगी व्यक्ती ) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांनी मौजे निरखेडा शिवारातील शेती गट क्रमांक 109 मधील 24 आर शेती विकत घेतली आहे. सदर शेत जमिनीचे फेर नोंद घेण्यासाठी तक्रारदार हे आलोसे क्र 01 यांना दि.23.04.2024 रोजी पंचासमक्ष भेटले. त्यावेळी आलोसे क्र. 01 यांनी तक्रारदार यांचे कडे त्यांचे शेतीचा फेर घेण्यासाठी 2,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1500/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तसेच आरोपी खाजगी व्यक्ती याने आलोसे क्र.01 याचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडे आलोसे क्र.1 यांचे साठी R.S या विदेशी दारूच्या क्वार्टरची मागणी केली आहे. आलोसे क्र. 01 तलाठी ढाकणे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आहे. आलोसे व खाजगी व्यक्ती यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे कदिम जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना., सापळा व तपास अधिकारी – शंकर म.मुटेकर, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना, गजानन कांबळे, अतिश तिडके , गजानन खरात, गजानन घायवट,संदीपान लहाने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी पार पाडली

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!