क्राईमताज्या बातम्यामराठवाडा

कृष्णापूरवाडीच्या शेतकऱ्याचा हायवा जालन्याचे दोघे घेवून गेले, ठरल्याप्रमाणे पैसेही दिले नाही ! फायनान्सवाल्याचे कर्ज थकले, खरेदी व्यवहाराच्या नावाखाली फसवणुकीचा गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर, दि. 24 -: तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकऱ्याने हायवा विक्रीचा व्यवहार जालन्याच्या दोघांसोबत केला. मात्र, ठरल्याप्रमाणे खरेदीदाराने हायवाची किंमत दिली नाही. फायनान्सवाल्याचे हफ्तेही थकले. यामुळे मूळ मालकाला फायनान्सची नोटीस आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

पवन किसनसिंग बहुरे (वय 28 वर्षे, व्यवसाय शेती, रा. कृष्णापुरवाडी, ता.जि., छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, पवन बहुरे यांनी त्यांच्या नावावर मोठ्या भावाला व्यवसाय करण्यासाठी सन 2018 मध्ये सेकंड हँड हायवा (क्र MH-06 Z-8400) ओम साई मल्टी सर्व्हिसींग यांचेकडून खडी मुरमवर चालवण्यासाठी घेतला होता व त्यावर श्रीराम फायनान्स कंपनीचे 1350000/- रूपये लोन व 450000/- रुपये कॅश देवून हायवा खरेदी केला होता. गाडी खरेदी केल्यानंतर बहुरे यांच्या भावाने सदर गाडी मार्च 2019 पर्यंत चालवली. त्यानंतर कोरोनामुळे लाकडाऊन लागल्याने गाडी घरीच उभी होती.

लॉकडाऊनमध्ये गाडीवर असलेले लोनचे हप्ते थकले होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर सदर गाडी समृध्दी महामार्गावर जून 2022 पर्यत चालवली. गाडी चालवून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने व गाडीचे फायनान्सचे हप्ता भरणे होत नसल्याने गाडी विक्री करण्याचे ठरवले. साई मल्टी सर्व्हिसेसचे ज्ञानेश्वर भिवसन जाधव यांच्याकडे विक्रीला काढली. त्यांनी ती गाडी सावंगी येथे लावली होती. दि. 22/07/2022 रोजी वरील गाडी बधन्यासाठी जालना येथील गणेश काकासाहेब वाघुंडे व त्यांच्यासोबत सचिन चाळसे हे आले. त्यांनी गाडी ट्रायल मारून पसंत केली. त्यानंतर दि. 23/07/2022 रोजी गणेश काकासाहेब वाघूंडे, सचिन चाळसे व इतर मित्र हे गाडीचा व्यवहार करण्यासाठी आले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

त्यानंतर ज्ञानेश्वर भिवसन जाधव यांनी बहुरे आणी चाळसे यांना कॅनॉट येथील जॉइंट कॅफे हॉटेलमध्ये बोलावले. त्यावरून बहुरे व त्यांचा भाऊ जीवन किसनसिंग बहुरे कॅनॉट परिसरात पोहोचले. तेथे ज्ञानेश्वर जाधव व जालन्याचे गणेश वाघंडे, सचिन चाळसे व इतर त्यांचे मित्र आलेले होते. तडजोडीअंती हायवाचा व्यवहार 1800000/- रुपयांमध्ये ठरला. त्यात नगदी 400000/- रुपये व उर्वरीत 1300000/- रुपये श्रीराम फायनान्स कंपनीचे लोन पंधरा दिवसांत निल करायचे व एक लाख रुपये गाडी पंधरा दिवसानंतर नावावर करून देतेवेळेस देण्याचे ठरले. व हायवा गाडीचा करारनामा करून ताब्यात घेवून जाण्याचे ठरले. त्यानंतर ते हायवा घेवून गेले.

त्यानंतर बहुरे यांनी त्यांना वारंवार फोन केला परंतू त्यांनी श्रीराम फायनान्सचे लोन भरले नाही व पंधरा दिवसानंतर फोन घेणे बंद केले. गणेश वाघुंडे, सचिन चाळसे यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर गाडीसाठी घेतलेले श्रीराम फायनान्स कंपनीच्या नोटिसा व जप्ती वॉरंट घरी येत असल्याचे बहुरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. असून त्यात माझे घरचे व भाऊ असे सर्व मानसिक तनावात आहेत.

याप्रकरणी पवन किसनसिंग बहुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश वाघुंडे, सचिन चाळसे यांच्यावर सिडको पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!