दोन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांची जीवनवाहीनी, स्मार्ट सिटी बसचा आज ६वा वर्धापन दिन ! जाधववाडीत अत्याधुनिक डेपो होणार, वातानुलुकीत 135 इलेक्ट्रिक बस येणार !!
छत्रपती संभाजीनगर, दि. 23 : आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व परवडणारी वाहतूक देणारी माझी स्मार्ट बसचे 5 वर्षे पूर्ण होऊन 23 जानेवारी 2024 ला 6वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत माझी स्मार्ट बस सेवा चालवण्यात येत आहे. 23 जानेवारी 2009 ला सुरु झालेली माझी स्मार्ट बस सुरवात झाल्यापासून नागरिकांची विशेष उद्योगात काम करणारे व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आवडती झाली.
या निमित्ताने स्मार्ट शहर बसचे मुख्य चलन व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी माहिती दिली की, प्रशासक यांच्या मार्गदर्शनात शहर बस विभाग मुकुंदवाडी येथील डेपोवर सकाळी 8.30 वाजता वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यानंतर सिडको बस स्टैंड व सर्व मुख्य बस थांब्यांवर प्रवाशांना पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. संध्याकाळी संत एकनाथ रंगमंदिर येथे सर्व चालक, वाहक व शहर बसचे कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
यासाठी बसेसला सजवण्यात आले आहे व स्मार्ट सिटी मुख्यालय वर रंगोली काढण्यात आली आहे. “ज्या बस सेवेची सूरुवात दररोजचे 3000 प्रवाशापासून झाली आज सरासरी दररोज 30,000 लोक सिटी बस मधून प्रवास करत आहेत. तरी लवकरच आपला जाधववाडी येथे अत्याधुनिक डेपो तयार होईल आणि नवीन वातानुलुकीत 135 इलेक्ट्रिक बस येणार आहे.
शहर बस मार्फत कोविड मध्ये बाधितांना कोविड सेंटर मध्ये पोचनवणे असो किंवा सणासुदीत व धार्मिक यात्रेत भाविकाना आणणे व सोडणे तत्पर, सुरक्षित व सोयीस्कर सेवा पुरवल्या गेल्या. माझी स्मार्ट बॉस मधे विद्यार्थ्यांना व दिव्यांग जनांना सवलत दिले जातात.
ठळक मुद्दे:
दररोजचे 1100 फेऱ्या
दररोज 24000 किमी फेऱ्या
एकूण मार्ग 30
90 बसेस
दररोजचे 30,000 प्रवासी
दररोजचे उत्पन्न 7 लाख