छत्रपती संभाजीनगर शहरात १०९ कुंडात्मक महायाग, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा पुढाकार !
छत्रपती संभाजीनगर, दि. 21- आयोध्या येथे उद्या होणाऱ्या प्रभु श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे १०९ कुंडात्मक महायागचे आयोजन करण्यात आले. यात १०८ कुंड आणि एक प्रधान श्रीराम कुंड असे एकूण १०९ कुंडात्मक महायाग कारण्यात आले.
हा सोहळा रविवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीराजे
क्रीडा संकुल एन. ५ राजीव गांधी मैदान येथे पार पडला. यासाठी सिडको आणि गारखेडा या मंडळांतील प्रत्येकी १०८ जोडप्यांना आमंत्रण देण्यात आले होते. तसेच प्रत्येक वार्डमधील १० नोंदणीकृत जोडप्यांना यात आमंत्रित कारण्यात आले होते.
महायाग आणि प्रधान श्रीराम महायागात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेक साधू संत-महंत विविध मंदिराचे मुख्य पुजारी देखील उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe