जालन्यात महिलेला कमरेच्या पट्ट्याने मारहाण, केस उपटले ! गल्लीत उभ्या मोटारसायकलला मुलाचा धक्का लागला म्हणून वादाची ठिणगी !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २१ – गल्लीत उभ्या असलेल्या मोटारसायकलला लहान मुलाचा धक्का लागला म्हणून त्याच्या गालात चापट मारल्याचा जाब विचारल्यावरून महिलेला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून तिचे केस उपटल्याची धक्कादायक घटना जालना शहरात घडली. जुना जालना, संजयनगर येथील एका गल्लीत हा राडा झाला.
मोटारसायकल उभ्या करण्यावरून व त्या मोटारसायकलला धक्का लागल्यावरून वादाची ठिणगी पडली. यात जखमी झालेल्या महिलेवर दीपक हॉस्पिटल जुना जालना येथे उपचार सुरु आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ज्या गल्लीत राहते त्याच गल्लीत अन्य एका महिलेकडे तिचे नातेवाईक हे भेटण्यासाठी नेहमी घराशेजारी संजय नगर जुना जालना येथे येत असतात. ते आल्यानंतर त्यांच्या मोटारसायकल या गल्लीत उभी करतात.
दिनांक-19/01/2024 रोजी रात्री 09.20 वाजेच्या सुमारास सदर महिलेला तिचे नातेवाईक नेहमीप्रमाणे भेटण्यासाठी आले होते व त्यांनी त्यांच्या मोटारसायकली फिर्यादी महिलेच्या घराशेजारी लावल्या होत्या. फिर्यादी महिलेचा लहान मुलगा हा गल्लीत खेळत असताना त्याचा गल्लीत उभ्या असलेल्या गाडीला धक्का लागला. तेव्हा शेजारी महिलेला भेटायला आलेल्या नातेवाईकाने फिर्यादी महिलेच्या मुलाच्या गालावर चापट मारली. तेव्हा मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई तथा फिर्यादी महिला व तिचा भाऊ यांनी जाब विचारला असता आरोपींनी त्यांनासुद्धा शिवीगाळ करून, मारहाण करण्यास सुरवात केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यानंतर एका आरोपीने कमरेचा पट्टा काढून फिर्यादी महिलेस मारहाण करण्यास सुरवात केली. फिर्यादी महिलेचे केस पकडून तिला खाली पाडले. नंतर एका आरोपीने लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर तेथील आजुबाजुच्या लोकांनी व फिर्यादी महिलेच्या पतीने उपचारकामी दीपक हॉस्पिटल जुना जालना येथे दाखल केले. सध्या फिर्यादी महिलेची प्रकृती बरी आहे. मारहाणीमध्ये फिर्यादी महिलेच्या डाव्या डोळ्याला मार लागला आहे. केस सुद्धा आरोपींनी धरुन उपटले. मुक्का मार दिला. या प्रकरणी जखमी महिलेच्या फिर्यादीवरून चौघांवर (रा-नाहदी कॉलनी दुखी नगर जुना जालना) यांच्यावर कदीम जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.