पुरुष कमाई जरूर करत असतील, पण कर्तुत्व, घर चालवणे या सर्व गोष्टींमध्ये महिला जेवढं लक्ष देऊ शकतात, तेवढं कोणीच देऊ शकत नाही: शरद पवार
सोलापूर, दि. २० – आरक्षणाचा प्रश्न ३३ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत नेला आणि त्याचा परिणाम, आज हिंदुस्थानामध्ये ठिक-ठिकाणी महिलांचे राज्य आलेले आहे. कर्तुत्वाचा वारसा हा फक्त पुरुषांकडे नसतो. पुरुष कमाई जरूर करत असतील, पण कर्तुत्व, घर चालवणे या सर्व गोष्टींमध्ये महिला जेवढं लक्ष देऊ शकतात, तेवढं कोणीच देऊ शकत नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज व्यक्त केले.
सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित महिला मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा असा हा कार्यक्रम आहे. मला आठवतंय की, मी राज्याचा मुख्यमंत्री असताना देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांना घेऊन या वस्तीमध्ये आलो होतो. त्यावेळी राजीव गांधींचे दर्शन लोकांना झाले आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक त्यावेळी झाली त्याची आठवण जुने लोक अजूनही काढतात.
आज सुनीता ताईंनी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. त्याच्या पाठीमागे या भागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न मग त्यात विजेच्या दराचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याकडे आजच्या सरकारचे आणि महानगरपालिकेचे लक्ष नाही आणि लक्ष न देण्याची त्यांची भूमिका ही बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्नाची पराकाष्टा करावी आणि तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये समस्या सोडवलेला दिवस यावा हा सुनिता ताईंचा उद्देश असतो.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
महिला मेळाव्यात भर दुपारी उन्हा-तान्हाचा विचार न करता एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांच्या अधिकाराबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल अतिशय गांभीर्याने लक्ष देणारा पक्ष आहे. हातामध्ये सत्ता होती त्यावेळी अनेक गोष्टींना आम्ही सुरुवात केली. महिलांना नगरपरिषद, नगरपालिका किंवा अन्य संस्था असो त्या ठिकाणी काम करण्यासंबंधीची संधी ही द्यायची असेल तर स्त्रियांना आरक्षण देण्याशिवाय गत्यंतर नाही ही भूमिका मंचावर बसलेल्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि म्हणून देशात पहिल्यांदा महिलांना नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्था या सगळ्यांमध्ये आरक्षण दिले आणि त्याचा परिणाम आपण गेले काही वर्ष बघत आहोत. कुठे ना कुठेतरी महिला निवडून आल्यात आणि महानगरपालिकेचे महापौर पद, सहकारी संस्थांचे अध्यक्ष पद तेथे महिला विराजमान झाल्या.
बऱ्याच ठिकाणी मी बघतो, ज्यावेळी आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळी महिलांच्या पाठीशी त्यांचे पतीदेव देखील यायला लागले आणि नंतरच्या काळात महिलांच्या विचारांमध्ये जागृती झाली आणि आज हे निर्णय फक्त महिला घेतात ज्यांना कष्टाचे मोल अधिक आहे आणि अशांच्या मार्फत राज्यात हे बदल घडू लागले.
आरक्षणाचा प्रश्न ३३ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत नेला आणि त्याचा परिणाम, आज हिंदुस्थानामध्ये ठिक-ठिकाणी महिलांचे राज्य आलेले आहे. कर्तुत्वाचा वारसा हा फक्त पुरुषांकडे नसतो. पुरुष कमाई जरूर करत असतील, पण कर्तुत्व, घर चालवणे या सर्व गोष्टींमध्ये महिला जेवढं लक्ष देऊ शकतात, तेवढं कोणीच देऊ शकत नाही म्हणून महिलांच्या हाताला संधीही द्यायला हवी इतके करून आम्ही इथेच थांबलो नाही, आम्ही महिलांसाठी काही क्षेत्र खुली केली.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं नेतृत्व लष्करातील जवान करत होते. आमच्या हाती सत्ता आली तेव्हा आम्ही महिलांना लष्करात ११% आरक्षण दिले आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व महिला करणार आहेत. हे आमुलाग्र बदल करण्याचे धोरण आम्ही लोकांनी केले त्या काळात असा धाडसी निर्णय घेण्यासाठी कोणी तयार होत नव्हते. अनेक क्षेत्र अशी आहेत की, त्या-त्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे.
आज महिला भगिनी विमान चालवतात, संघर्षासाठी उभ्या राहतात, हातामध्ये शस्त्र घेतात, देशाच्या सीमेचे रक्षण करतात, देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतात, असेही पवार म्हणाले.