ताज्या बातम्यामराठवाडा

पणन संचालकांच्या निषेधार्थ हमाल कष्टकऱ्यांची उद्या बाजार समितीवर निदर्शने ! अन्यायकारक परिपत्रकाची होळी करणार !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ – वाराई कामास प्रतिबंध करणारे परिपत्रक काढून हमाल कष्टकऱ्यावर अन्याय करणाऱ्या राज्याचे पणन संचालकाच्या निषेधार्थ बाजार समितीवर उद्या, १९ जानेवारी रोजी तीव्र निदर्शने केली जाणार असल्याची माहिती मराठवाडा लेबर युनियन व बाजार समितीचे संचालक साथी देविदास किर्तीशाही यांनी दिली.

हमाल कष्टकरी व माथाडी कामगारांना पै-पै साठी घाम गाळावा लागतो. काम केले तरच त्याच्या घरची चूल पेटते. कोणतेही विकास काम माथाडी कामगाराचे सहभागाशिवाय पूर्णच होवू शकत नाही. ते काम बाजार समिती मधील असो, गोदामातले असो, कारखान्यातले असो की रेल्वे माल धक्क्याचे….. असे असतांना मात्र हमाल कष्टकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी केली जात आहे.

म्हणून पणन संचालकांचे अन्यायकारक परिपत्रकाचा शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीवर निदर्शने करून परिपत्रकाची होळी केली जाणार आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

या निदर्शनाचे वेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ऍड. सुभाष सावंगीकर, उपाध्यक्ष साथी छगन गवळी यांचा सहभाग असणार आहे.

या निदर्शनात हमाल कष्टकरी व माथाडी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साथी छगन गवळी, साथी प्रवीण सरकटे, साथी उत्तम नरवडे, साथी नाजीम भाई, साथी अली खान, साथी शेख रफिक यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!