क्राईमताज्या बातम्यामराठवाडा

घाटीच्या अपघात विभागात १० ते १२ जणांची हाणामारी, डॉक्टरांच्या डोक्यातही लाकडी दांडक्याने हल्ला !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ – डोळ्याला जखम झालेल्या पेशन्टसोबत दोघे आले त्या मागोमाग १० ते १२ जण तेथे आले. त्यांच्यात चापट बुक्क्यांनी हाणामारी सुरु झाली. यातील एकाने डॉक्टरांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले.

दि. ११ जानेवारी रोजी सध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पृथ्वी अरुन भोगे (वय २८, नर्सिंग होम होस्टेल, घाटी दवाखाना, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी डॉक्टरांचे नाव आहे. त्यांना डोक्यात मुका मार लागला.

संध्याकाळी 06.45 वाजेच्या सुमारास एक डोळयाला जखम असलेला पेशन्ट औषध उपचार कामी घाटीच्या अपघात विभागात आलेला होता व त्याच्या सोबत दोन नातेवाईक तेथे हजर होते. तितक्यात त्या पेशन्टजवळ अजून दहा ते बारा अनोळखी लोक त्या ठिकाणी आले व त्याच्यात चापट बुक्याने मारहान सुरु झाली. तेव्हा ते लोक डॉक्टरांच्या टेबलकडे सरकले. त्यामुळे डॉक्टरांना बाहेर निघण्यासाठी अडचण झाली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तितक्यात डॉक्टर पृथ्वी भोगे मधुन बाहेर पडण्याचा प्रत्यन करित असताना यातील ऐकाने त्यांच्या डोक्यात उजव्या बाजुस मागच्या साईडला लाकडी दांड्याने किवा लोंखडी रोडने मारले. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे डॉक्टरांच्या डोक्यात मुका मार लागला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि हिवराळे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!