ताज्या बातम्यामराठवाडा

थकीत मालमत्ता धारकांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार, वसुली कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीचा बडगा ! मालमत्ता वसुलीसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ८ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सर्व झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सर्व १ ते १० प्रशासकीय कार्यालय अंतर्गत थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सर्व थकबाकीदारांना क्रमांक ०१ ते ०३ नोटिसा बजावण्यात आल्या असताना सुद्धा तसेच उर्वरित थकबाकीदारांना वारंवार तोंडी सूचना व भ्रमणध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट देऊन थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणा करणे बाबत कळविण्यात आले होते. तरी बऱ्याच बड्या थकबाकीदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या निदर्शनास आले आहे.

या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त कर अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा सर्व थकीत मालमत्ता धारकांची नावे जाहीर प्रगटना द्वारे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी सर्व शहरवासीयांना प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा त्वरित करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे. मालमत्ता धारकांची नावे जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही बाब विचारात घेतली जाणार नाही असे प्रशासनाचे वतीने कळविण्यात आले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

वसुली कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपातीची सुरुवात- आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सर्व ०१ ते १० प्रशासकीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली करिता नियुक्त वसुली कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वसुली संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. प्रशासकांनी वेळोवेळी वसुली संदर्भात आढावा घेताना ज्या कर्मचाऱ्यांची वसुली निरंक आहे अशा कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही अशा सूचना दिल्या होत्या. त्या अंतर्गत आज आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व ०१ ते १० प्रशासकीय कार्यालय अंतर्गत एकूण ३१ मनपा आस्थापना वरील व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपातीची सुरुवात करण्यात आली आहे. यात आस्थापनेवरील कर्मचारी यांच्या वेतनातून १००० रु व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कमी करण्यात येणार आहे. यात प्रशासकीय कार्यालय ०१ अंतर्गत ०५ , प्र.का.०२ – ०२,
प्र.का.०३- ०३, प्रं.का.०४- ०९
प्र.का.०६- ०२ , प्र.का.०८- ०५, प्र.का.०९-०१ व प्र.का.१० अंतर्गत ०२ कर्मचारी यांचा समावेश आहे.

मालमत्ता वसुली करीता विशेष टास्क फोर्स- थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली भरणा करणे करिता प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊन सुद्धा अद्याप बड्या थकबाकीदारांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा केलेला नाही. या अंतर्गत प्रशासनाच्या वतीने जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याकरिता अटकवणी व जप्तीची कारवाई नियोजन पद्धतीने करणे करिता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे अशी माहिती उप आयुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!