आईला फावड्याने कापून निर्घृण खून ! शेतजमीन नावावर केली नाही म्हणून खळबळजनक हत्याकांड !!
लखनौ, दि. १० – शेती नावावर केली नाही म्हणून निर्दयी पोराने आपल्या आईचा खून केल्याची खळबळजनक घटना उत्तरप्रदेशमधील सीतापूर परिसरात घडली. फावड्याने वार करून निर्घृण खून केल्याने पवित्र अशा माय लेकाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूरमधील धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. सीतापूर येथील ताळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मेजापूर गावात ही थरकाप उडवणारी घटना घडली. दिनेश पासी (वय ३५ वर्षे) याने त्याची आई कमला देवी (वय ६५) यांची हत्या केली. शेतजमीन नावावर करत नसल्याचा रागातून त्याने हे हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अंगावर शहारे आनणार्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून वातावरण गरम झाले आहे. मुलाने शेतात फावड्याने आईची हत्या केली. त्यानंतर त्याने डोके धडावेगळे केले. मृतदेह घरात लपवून ठेवला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe