ताज्या बातम्यामराठवाडा

माझी लाडकी बहीण योजना: सर्व ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी नोंदणी करण्याचे निर्देश !

छत्रपती संभाजीनगर- ‘मुख्यमंत्रीःलाडकी बहीण योजना’ या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे काम हे सुनियोजित व अचूक पद्धतीने करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या योजनेशी संबंधित जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा उपविभाग, तालुका व गावपातळीपर्यंत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यासाठी  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.पूर्ण निकषांची पूर्तता करुन सर्व ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी नोंदणी करावी. याबाबत सर्व संबंधित घटकांनी गावनिहाय नियोजन करावे व  जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करावी.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ग्राम पातळीवर करावयाच्या नियोजनाबाबत सुचना दिल्या.चावडी वाचन, विविध नोंदणी शिबिराच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करावी. आशा, अंगणवाडी सेविका,  पर्यवेक्षिका यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणेने यामध्ये पुढाकार घेऊन नोंदणी पूर्ण करावी,असे निर्देश विकास मीना यांनी दिले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!