ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना : रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा !

नांदेड परिमंडळात  ७ हजार ६०६ अर्ज प्राप्त, ६४३ वीजग्राहकांनी केली सौरऊर्जेची सुरवात

अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

नांदेड, दि.२० जुलै : घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मितीसंच बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत नांदेड परिमंडळातील ७ हजार ६०६ वीजग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले असून, ६४३ वीजग्राहक वीज वापरकर्तेच नव्हे तर वीजनिर्मातेही झाले आहेत. या योजनेअंतर्गत ३० हजारापासून जास्तीत जास्त ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री अनिल डोये यांनी केले आहे.

मुख्य अभियंता श्री डोये म्हणाले की, वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्हयातील २ हजार ९८९ वीज ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून ३४४ वीजग्राहकांनी प्रत्यक्ष सौरऊर्जा निर्मीतीची सुरवात केली आहे. तसेच परभणी जिल्हयातील २ हजार ९२७ वीज ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून २२३ वीजग्राहकांनी प्रत्यक्ष सौरऊर्जाा निर्मीतीची सुरवात केली आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्हयातील १ हजार ६९० ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून ७६ वीजग्राहकांनी प्रत्यक्ष सौरऊर्जाा निर्मीतीची सुरवात केली आहे. उर्वरीत वीजग्राहकांनी पैसे भरून एजन्सी निवडीची प्रक्रिया पुर्ण केली असून लवकरच ते ग्राहक प्रत्यक्ष सौरऊर्जा निर्मितीस सुरवात करतील.   

रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. वीजग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे.

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते.

विभागनिहाय स्थिती

हिंगोली विभाग-

प्राप्त अर्ज- १६९० क्षमता- ४८४६ किलोवॅट

कार्यान्वीत- ७६

भोकर विभाग-

प्राप्त अर्ज-४४१ क्षमता- १३०४ किलोवॅट

कार्यान्वीत- १८

देगलूर विभाग-

प्राप्त अर्ज- ४२५, क्षमता- १३०० किलोवॅट

कार्यान्वीत-२४

नांदेड विभाग-

प्राप्त अर्ज- १६५७, क्षमता- ६७७१ किलोवॅट

कार्यान्वीत- २९९

नांदेड ग्रामीण विभाग- 

प्राप्त अर्ज-४६६, क्षमता- १३०६ किलोवॅट

कार्यान्वीत- ०३

परभणी विभाग क्र.१-

प्राप्त अर्ज- १६८२, क्षमता- ५६८५ किलोवॅट

कार्यान्वीत- ७०

परभणी विभाग क्र.२- 

प्राप्त अर्ज- १२४५, क्षमता- ३९५१ किलोवॅट

कार्यान्वीत – १५३

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!