माजलगाव पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकरच्या मिरजच्या युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या लॉकरची झाडाझडती ! सोन्याच्या बिस्किटांसह १ कोटी ६१ लाखांचे घबाड सापडले !!
छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ – भ्रष्ट्राचार प्रकरणातील आरोपी माजलगाव पाटबंधारे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्या मिरजच्या युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या लॉकरीची आज झाडाझडती घेण्यात आली. सोन्याच्या बिस्किटासह १ कोटी ६१ लाखांचे घबाड सापडले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा ऐवज ताब्यात घेतला आहे.
पोलीस स्टेशन परळी शहर गुरंन.73/2024 कलम 7, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील मुख्य आरोपी राजेश आनंदराव सलगरकर, कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग,परळी यांचे मिरज जिल्हा सांगली येथील युनियन बॅंक ऑफ इंडिया बॅंकेतील लॅाकरची झडती दिनांक 31/05/2024 रोजी घेण्यात आली. या झडतीवेळी आरोपी सलगरकर यांच्या उपस्थितीत व पंचा समक्ष लॅाकरची झडती घेतली असता मुददेमाल मिळून आला.
मिळून आलेला मुद्देमाल
1)रोख रक्कम : 11 लाख 89000 रुपये
2)सोने : एकूण 2 किलो 105 ग्रॅम ज्यामधे (1114 ग्रॅम वजनाचे 7 बिस्कीटे व 991 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिणे) किंमत अंदाजे 1 कोटी 50 लाख
अशी एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. रोख रक्कम व सोन्याचे दागिणे पंचा समक्ष जप्त करुन ताब्यात घेण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शिंदे, पोलीस उप -अधीक्षक, ला.प्र.वि.बीड, घरझडती पथकात पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, हनुमान गोरे , अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांचा समावेश होता.