क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

वैजापूर तालुक्यात वाळू ठेकेदारावर चाकू हल्ला ! पुरणगांवच्या आरोपींवर गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ -: पोलीस ठाणे विरगांव हद्दीत वाळु ठेकेदारावर प्राणघातक हल्ला करणार्या आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे वैजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पुरणवावच्या आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौकशीचा फार्स आवळला आहे.

दिनांक 21/05/2024 रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास मौजे पुरणगांव शिवारात गोदावरी नदी पात्रात फिर्यादी अनुराग आप्पासाहेब शिंदे (व्यवसाय ठेकेदारी रा. छत्रपती संभाजीगनगर) हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजने साठी शासकीय वाळु डेपो वरून वाळू उपसा करत असताना आरोपी दादासाहेव नवनाथ ठोंबरे, प्रदिप संदीप कसबे, युवराज नारायण ठोंबरे, मनोज विकास ठोंबरे, अक्षय ठोंबरे, इंदर ठोंबरे (सर्व रा. पुरणगांव) तसेच ४ ते ७ अनोळखी व्यक्तींनी संगणमत करून शासनाने ठरवून दिलेल्या वाळु पट्यात जावून बेकायदेशीर वाळु उपसा करु लागल्याने फिर्यादी त्यांना समाजवून सांगितले की, सदर वाळु पट्टा हा आम्हाला शासनाने दिला आहे.

आपण वाळू उपसा करु नये. असे सांगत असतांना आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून अक्षय ठोंबरे याने त्याच्या खिशातील चाकु काढून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्यमाने तो चाकु फिर्यादीच्या मानेवर मारण्यासाठी उगारला असता तो वार फिर्यादीने डाव्या हातावर झेलला तसेच साक्षीदार यास सुध्दा लोखंडी रॉडने व चाकुने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाले आहेत.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तसेच फिर्यादीचे जेसीबी मशीन, ट्रॅक्टरची तोडफोड करून नुकसान केले या फिर्यादीवरून पोलीस ठाणे विरगांव येथे गुरंन १६८/२०२४ कलम ३०७,३२६,३२४,१४३,१४७,१४८,१४९,४२७,३२३,७०४,७०६ भादंवि सहकलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि डी आर औटे हे करीत आहे.

सदर गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी व पोलीस ठाणे विरगांव प्रभारी अधिकारी हे स्टाफसह घटनास्थळी जावुन घटनास्थळाची पाहणी करून तसेच आरोपीतांचा शोध घेणे कामी रवाना होवून ०४ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपीतांना अटक करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.

सदर गुन्हयातील आरोपीतांचा पूर्व इतिहास पाहता दादासाहेब नवनाथ ठोंबरे, युवराज नारायण ठोंबरे व मनोज ऊर्फ विकास मधुकर ठोंबरे यांचेवर यापूर्वी कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!