कन्नड तालुक्यातील पाटबंधारे विभागाचा चिंचोली लिंबाजीचा दप्तर कारकून पाच हजारांची लाच घेताना जाळ्यात !
पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्पातून मातीचा गाळ JCB ने उपसा करून ट्रॅक्टर ने वाहतूक करू देण्यासाठी घेतली लाच
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ – पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्पातून मातीचा गाळ JCB ने उपसा करून ट्रॅक्टर ने वाहतूक करू देण्यासाठी कन्नड तालुक्यातील पाटबंधारे विभागाचा चिंचोली लिंबाजीचा दप्तर कारकून पाच हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकला.
राहुल पांडुरंग सुरवसे, वय 42 वर्षे, नोकरी, दप्तर कारकून, पाटबंधारे विभाग, उपविभाग 3, चिंचोली लिंबाजी, ता कन्नड, जि छत्रपती संभाजी नगर, रा. चिंचोली लिंबाजी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर. वर्ग 3, असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार हे पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्पातून मातीचा गाळ JCB ने उपसा करून ट्रॅक्टर ने वाहतूक करून त्यांच्या शेतात टाकत आहेत, त्यांना माती गाळ शेतात टाकून देण्यासाठी व त्यांचे JCB व ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आरोपी राहुल पांडुरंग सुरवसे यांनी पंचा समक्ष 5500 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 5000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लागलीच 15/05/2024 रोजी पंचासमक्ष 5000/रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. आरोपी राहुल पांडुरंग सुरवसे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, अमोल धस, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि . छत्रपती संभाजी नगर, सापळा पथक – पोह/ अशोक नागरगोजे, पो अं, युवराज हिवाळे, चालक पो अंमलदार बागुल, लाप्रवि. छत्रपती संभाजी नगर यांनी पार पाडली.