ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

बिडकीन मार्गे जाणाऱ्या सर्व जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश ! या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ९-  जलवाहिनीच्या कामानिमित्ताने बिडकीन मार्गे जाणार्या सर्व जड वाहनांची वाहतूक तात्पूरत्या काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

पैठण महार्गावरिल बिडकीन शहरालगत असलेल्या निलजगाव फाटा ते शेकटा फाटा दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधीकरण मार्फत जलवाहीनी पाईपलाईनचे टाकण्याचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशांने प्रगतिपथावर असून बिडकीन शहरातून जाणा-या मुख्य रस्त्यावर जलवाहिनीचे काम चालू आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर कडून बिडकीन मार्ग पैठणकडे जाणारी तसेच जालना सोलापूर धुळे महामार्गावरून कचनेर बिडकीन मार्गे पुणे व अहमदनगर कडे जाणारी सर्व जड वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल करण्यात आला आहे.

दिनांक 10/05/2024 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते पुढील आदेशा पर्यंत बिडकीन शहरातून जाणारी सर्व जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. या मार्गावरिल जाणा-या सर्व जड वाहनधारका करिता खालील प्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला असून जड वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

पूर्वीचा जड वाहतूक मार्ग व बदल करण्यात आलेला जड वाहतूक मार्ग खालील प्रमाणे

१) छत्रपती संभाजीनगर ते पैठण कडे जाणारी जड वाहतूक आता छत्रपती संभाजीनगर- निलजगाव फाटा- एल. अँड टि मार्गे डि.एम.आय. सी. रोड मार्गे पैठणकडे जातील.

२) पैठण ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी जड वाहतूक आता पैठण डि.एम.आय.सी. रोड एल अँड टि. निलजमाव फाटा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

३) जालना रोडवरील करमाड मार्गे कचनेर कमान कचनेर गाव पोरगाव फाटा निलजगाव फाटा- बिडकीन- बिडकीन शेक्टा फाटा इसारवाडी फाटा ते अहमदनगरकडे जाणारी जड वाहतूक आता जालना रोड करमाड- केंब्रीज चौक झाल्टा फाटा- अंबिका हॉटेल ते सोलापूर धुळे हायवे नं ५२ वरून गांधेली सातारा- ए.एस. क्लब मार्गे अहमदनगर व पुणे, धुळे, नाशीककडे जातील.

४) अहमदनगर इसारवाडी फाटा- बिडकीन कचनेर कमान करमाड मार्गे जालनाकडे जाणारी जड वाहतूक आता अहमदनगर पुणे रोडवरील इसारवाडी फाटा वाळूज ए.एस. क्लब चौकातून सोलापूर थुळे एन.एच.नं. ७२ मार्गे, सातारा गांधेली आडगाव बु. हॉटेल अंबिका- झाल्टा फाटा- केंब्रीज चौक ते जालनाकडे जातील.

५) सोलापूर- धुळे मार्गाने कचनेर कमान, पोरगाव फाटा, एल. अॅडं टि कंपनी बिडकीन, शेक्टा फाटा इसारवाडी फाटा ते अहमदनगर पुणे कडे जाणारी जड वाहतूक आता अहमदनगर पुणे रोडवरील इसारवाडी फाटा वाळूज ए.एस. क्लब- सोलापूर- धुळे एन.एच-५७२ वरून सातारा- गांधेली निपाणी कचनेर कमाण मार्गे सोलापूरकडे जातील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!