छत्रपती संभाजीनगर, दिनांक 24- एम.पी.डी.ए कायद्यान्वये पैठण येथील कुख्यात गुन्हेगार एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. अशपाक युनूस शेख वय 24 वर्षे रा. पापानगर, भोईवाडा पैठण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर असे त्याचे नाव आहे.
संघटित गुन्हेगारी करणा-या विरूध्द पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्हयातील गुन्हेगारीमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगार तसेच त्यांच्या टोळयांना लक्ष्य करत त्यांचेवर पोलीसांचा वचक निर्माण करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अशा गुन्हेगारांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी त्याचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये सक्त कारवाई करून त्यांना एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द करून त्यांचे गुन्हगारीला लगाम लावली आहे.
पोलीस अधीक्षक यांनी आतापर्यंत वाळु माफिया, गावठी दारु बनवणारा व विक्री करणारा तसेच सराईत गुन्हेगार अशा एकुण 10 गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. पोलीस ठाणे पैठण हद्यीतील अशपाक युनूस शेख वय 24 वर्षे रा. पापानगर, भोईवाडा पैठण ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरूध्द पोलीस ठाणे पैठण येथे खालील भादंवी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. अ) पो.स्टे. पैठण कलम 307, 384,504,506 भादंवी (02 गुन्हे) ब) पो.स्टे. पैठण कलम 392, 34 भादंवी क) पो.स्टे. पैठण कलम 457, 380 भादंवी ( 02 गुन्हे)
ड) पो.स्टे. पैठण कलम 324, 323,504,506 भादंवी अशा प्रकारे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याचेवर कलम 110 (ई) (ग) फौजदार प्रक्रिया संहिता अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचेवर खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, जबरी चोरी, दुखापत व चोरी, गृहअतिक्रमण करणे, असे शरिराविरूध्द व मालाविरूध्दचे एकुण 06 गुन्हे दाखल असुन तो बेकायदेशिर कृत्ये करून धाक-दपटशा करण्याचा सवईचा असुन त्याच्या अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातारण निर्माण झाले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्याचे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंध कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्याच्येवर काहि एक परिणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या. त्याअनुषंगाने एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, धोाकदायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळु तस्कर, व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, दृक श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेसी) असे विद्यातक कृत्य करणा-या व्यक्तींना आळा घालण्याबाबत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते.
त्यामुळे मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व पैठण पोलीसांनी त्याचे विरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे कडे सादर करण्यात आला होता. यावरून दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 26/4/2024 रोजी आरोपी अशपाक युनूस शेख वय 24 वर्षे रा. पापानगर, भोईवाडा पैठण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरूध्द एम.पी.डी.ए अधिनियम 1981 चे कलम 3 (1), 3(2) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला. त्यावरुन त्यास दिनांक 27/04/2024 रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामिल करून मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मनीष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक,यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.सिध्देश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पैठण, सतिष वाघ, पोलीस निरीक्षक,स्था.गु.शा संजय देशमुख,पोलीस निरीक्षक, पैठण, सपोनि सिध्देश्वर गोरे, पोलीस अंमलदार दिपक सुरोसे, सुधीर ओव्हर, महेश माळी, नरेंद्र अंधारे, कल्याण ढाकणे, अंकुश शिंदे यांनी केली आहे.