क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

नागद चाळीसगाव रोडवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! कन्नड तालुक्यातील हासरवाडी, गोपेवाडी, नागदच्या जुगाऱ्यांना पकडले !!

छत्रपती संभाजीनगर, दिनांक २७ – पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याचे शेडमध्ये चालू असलेल्या जुगार अडयावर धाड टाकण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी 5,03190/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागद चाळीसगाव रोडवरील हॉटेल आदित्य परमिट रूम व बिअरबारच्या पाठीमागील भागात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये  जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

1) भावगिर निंबागिर गोसावी वय 31 वर्षे रा. हारसवाडी ता. कन्नड 2) दगडु शंकर राठोड वय 45 वर्षे रा. गोपेवाडी ता.कन्नड 3) अनिल बाबु चव्हाण वय 24 वर्षे रा. हारसवाडी ता. कन्नड 4) राहुल काकाजी झाल्टे वय 31 वर्षे रा. हातले ता. चाळीसगाव 5) निलेश दिलीप राजपूत वय 35 वर्षे रा. नागद ता. कन्नड यांना पोलिसांनी घटनास्थळावरून पकडले. तसेच त्यांचेकडून समजले की सदरचा पत्यांचा क्लब हा राजेंद्र शेषराव राठोड (वय 45 वर्षे रा. जाधववाडी टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर) हा अवैधरित्या चालवत आहे.

पोलिस पथकाने मागील काही दिवसांमध्ये पोलीस ठाणे अजिंठा, पाचोड, फुलंब्री, देवगाव रंगारी, कन्नड ग्रामीण हद्यीतील ऑनलाईन चक्री चालक, तसेच अवैध जुगार अड्यावर छापेमारी करून 32 जुगारी व्यक्ती विरुध्द गुन्हे दाखल करून 17,06,870/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

याअनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकास दिनांक 25/04/2024 रोजी माहिती मिळाली कि, नागद चाळीसगाव रोडवरिल हॉटेल आदित्य परमिट रूम व बिअरबारच्या पाठीमागील भागात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती हे तिरट व झन्ना- मन्ना नावाचा जुगार हा पत्त्यावर (कॅट) खेळत व खेळवीत आहे अशी माहिती मिळाली होती.

यावरून पथकाने कारवाईच्या अनुषंगाने हॉटेल आदित्य परमिट रूम व बिअरबार परिसराची बारकाईने व छुप्यापध्दतीने पाहणी केली असता हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोटरसायकली उभ्या असलेल्या दिसून आल्याने तसेच हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या एका पत्राचे शेडमध्ये काही व्यक्तींची संशयित हालचाल नजरेस पडली. यावरून सापळा लावून छापा मारण्याचे नियोजन केल्यानुसार विशेष पथकांने दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास लपत छपत जावून पत्र्याचे शेडच्या बाजुला दबा धरला.

त्यानंतर अचानक छापा टाकला असता, तिथे 13 ते 14 जण हे पत्यावर तिर्रट व झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना दिसून आले. पोलीसांनी अचानक झडप घालून कारवाई केल्याने जुगार खेळणार्या व्यक्तींची धांदल उडाली. यातील काही जण हे मिळेल त्या रस्त्याने सैरावैर पळत सुटले. परंतु पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून 5 जणांना ताब्यात घेतला.

या कारवाईमध्ये रोख 24190/- रुपयांसह 09 दुचाकी वाहने, मोबाईल फोन, पत्ताचे कॅट, इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 5,03190/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण हे करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील स.पो.नि. सुदाम सिरसाठ, पोलीस अंमलदर नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापस, गणेश सोनवणे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!