महिलेसोबत फोटो काढून ते पतीला व आई वडीलांना दाखवण्याची धमकी देवून बलात्कार ! पीडितेच्या तक्रारीवरून जालन्यातील युवकावर गुन्हा !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २६ – धमकावून महिलेसोबत फोटो काढून ते फोटो पतीला व आई वडीलांना दाखवण्याची पुन्हा धमकी देवून बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.
पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक 22/12/2023 ते दिनांक 15/04/2024 रोजीचे दुपारी 12.00 वाजे पावेतो इंद्रप्रस्त कॉलनी बजाजनगर (ता.जि.छत्रपती संभाजीनगर) येथे जितेंद्र परसरराम गडदे याने पीडित महिलेला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवून पीडितेसोबत मोबाईलमध्ये फोटो काढून ते फोटो पतीला व आई वडीलांना दाखवण्याची धमकी देवून बळजबरीने शारीरिक संबंध केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र परसराम गडदे (वय ३०, रा. मुळगाव किनखेडा, ता. मंठा, जि. जालना) याच्यावर एम वाळुज पोलिस स्टेशनमध्ये ३८७/२४ कलम ३७६ (२) (एन), ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि वायदंडे करीत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe