सगळे पक्ष काँग्रेसवर आणि इंदिरा गांधींवर टीका, हल्ले करत होते एकच नेता त्यावेळी उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे: शरद पवार
अमरावती, दि. २३ – काही लोक मला विचारतात, तुम्ही सगळे एकत्र? तुम्ही या पूर्वी एकमेकांच्या विरुद्ध लढला? म्हटलं हो..! काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचारांना अनेक वर्षापासून काम करतोय. आम्हा सगळ्यांची विचारधारा ही गांधी नेहरूंची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेनं आम्ही काम करतो. लोक विचारतात शिवसेनेचं काय? शिवसेनेचं वैशिष्ट्य हे, की या देशामध्ये कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वानं पहिल्यांदा देशाचा विचार केला. मला आठवतंय १९७७ साली देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षावर टीका टिप्पणी करत होते. इंदिरा गांधीच्यांवर हल्ले करत होते, एकच नेता त्यावेळी उभा राहिला, आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की, हा देश पुढे न्यायचा असेल, या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशातील समस्या कमी करायच्या असतील तर इंदिरा गांधी या करू शकतात आणि इंदिरा गांधींना जाहीरपणाने समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद आहे की, आम्हा दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धव ठाकरे आणि त्यांचा सैनिक ठीक ठिकाणी उभा राहिला आहे, असे जाहीर वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
अमरावती येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले की, गेले काही दिवस उद्धव ठाकरे, मी स्वत: आणि आमच्या आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे काही संकट आज देशावर दिसतंय त्या संकटातून मुक्तता कशी करता येईल याचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी आल्यानंतर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात. सार्वजनिक जीवनामध्ये मी कामाची सुरुवात केल्यानंतर तरुणांच्या चळवळीमध्ये सहभागी झालो. महाराष्ट्राभर फिरलो, पण अमरावती हे एक असं ठिकाण होतं की याठिकाणी तरुणांची एक जबरदस्त अशी शक्ती उभी राहिली. आणि आम्हा सगळ्यांना काम करण्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं. म्हणून अमरावतीचा अभिमान मला अंतःकरणापासून आहे. पण आज याठिकाणी मी आलो ती एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी… मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की, एक चूक माझ्याकडून झाली… पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केलं आणि गेल्या ५ वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की, कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सामाजिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणारं आहे, अशा बळवंत वानखेडेंना मोठ्या मतांनी इथून विजयी करा हे सांगण्यासाठी याठिकाणी आलो आहे.
१० ते ११ वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हे या देशाच्या इतिहासात कुणीही पुसू शकत नाही- आज देशाची एकूण सत्ता ही मोदी साहेबांच्या हातामध्ये आहे. गेले १० वर्ष आपण बघतोय, अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकतो. काहीही सांगतात ते हल्ली. मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेली ५६ वर्ष आहे आज हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये अशी कोणती व्यक्ती नाही की जो एके दिवसाच गॅप न घेता ५६ वर्ष सतत निवडून येतो. या ५६ वर्षांमध्ये अनेकांना जवळून पाहिलं, लांबून पहिलं. इंदिरा गांधींना पाहिलं, राजीव गांधी आणि आम्ही एकत्र संसदेत होतो त्यांचं कामकाज पाहिलं. नंतरच्या काळामध्ये नरसिंहरावांचं काम पाहिलं. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. मनमोहन सिंहांच्या वेळेस काम केलं. अलीकडच्या काळात जे जे प्रधानमंत्री झाले, जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची पद्धत ही आम्ही लोकांनी पाहिली. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे, भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल याप्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल, अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला. आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंवर टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका करतात. ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यांच्या पूर्वकाळामध्ये आमच्या आयुष्याची उमेदीची काळ जवळपास १० ते ११ वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली. त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हे या देशाच्या इतिहासात कुणीही पुसू शकत नाही आणि तेच आजचे प्रधानमंत्री हे त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
१० वर्षात मी काय केलं हे सांगण्याऐवजी आम्हा लोकांना विचारतात तुम्ही गेल्या १० वर्षात काय केलं. – कुठेही गेले तरी बघा, १० वर्षात मी काय केलं हे सांगण्याऐवजी आम्हा लोकांना विचारतात तुम्ही गेल्या १० वर्षात काय केलं. अरे २०१४ ते २०२४ तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांच्या टीका टिपण्णी करायची, हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे त्याचा अर्थ स्पष्ट हा आहे की, व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा असला पाहिजे, त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वामध्ये आहे आणि म्हणून अशांच्या हातातून सत्ता काढून घेण्याचं काम हे करायला लागेल. त्यासाठी दुसरा कुठला पर्याय नाही.
मोदी साहेब तिथे जातात म्हटल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात- त्यांची कामाची पद्धत बघितल्यानंतर आज आम्ही सातत्याने सांगतोय की, पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, खासदार लोकांशी गप्पा गोष्टी करतो. पार्लमेंटमध्ये एक सेंटर लावलंय ते तुम्हाला माहीत असेल आणि ती जागा अशी आहे, राज्यसभा असो की लोकसभा असो, त्याचे सदस्य वेळ असला की त्याठिकाणी एकत्र भेटतात. तो कुठल्याही पक्षाचा असो, बोलतात, गप्पा मारतात काही प्रश्न असतील ते मांडतात. तिथे कधी पक्षीय अंतर कुणी आणत नाही. पण आम्ही अलीकडे पाहतो की, मोदी साहेब तिथे जातात म्हटल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात, त्यांना दिसता कामा नये विरोधकांशी आम्ही बोलतोय म्हणून. एकप्रकारची दहशत त्यांच्यावर सुद्धा त्याठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम त्याठिकाणी होतंय. अशा दहशत असणाऱ्या पक्षाच्या सदस्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का?
राजस्थानमध्ये भाजपच्या खासदार जाहिरपणानं मागणी करतात की. या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे- सत्ताधारी पक्षाचे खासदार हळूच कानात आम्हाला सांगत असतात की, दर मंगळवारी तिथे पक्षाची बैठक असते. आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही, लोकांना आपलं मत मांडता येत नाही, मोदी साहेब बोलणार, ते विचार मांडणार, ते ऐकायचं, आणि सगळ्यांनी जायचं. दुसरं कुणालाही त्याठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो. तो राज्यकर्ता म्हणजे Me & Entire पूर्ण रशिया. रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन. आज या देशामध्ये मोदींच्या रुपानं नवीन पुतीन तयार होतोय का काय ही चिंता या देशाच्या जनतेला आहे आणि म्हणून आज सातत्याने अनेक लोक बोलतात की, या देशाची संसदीय लोकशाही संकटात जाईल असं, चित्र दिसतंय, आणि ते मी म्हणतोय असं नाही. हेगडे नावाचे एक मंत्री, केंद्र सरकारचे मंत्री बंगोरलचे. त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की, हा देश ज्या पद्धतीने मोदींना चालवायचा आहे, ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे. राजस्थानमध्ये भाजपच्या खासदार जाहिरपणानं मागणी करतात की. या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या. उत्तर प्रदेशमधील एक खासदार आहे, जे जाहीरपणाने सांगतात की मोदींचे हात बळकट करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करायची गरज आहे.
पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं तिथे लष्करशाही होती, श्रीलंकेमध्येही लष्करशाही होती, बांग्लादेशमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये हुकूमशाही होती- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशासाठी करून ठेवलंय आणि ते म्हणजे संविधान! तुम्ही देशाच्या आजूबाजूची स्थिती बघा पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं तिथे लष्करशाही होती, श्रीलंकेमध्येही लष्करशाही होती, बांग्लादेशमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये हुकूमशाही होती, भारताच्या आजूबाजूला कधीतरी आपण ही हुकूमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे. या संविधानावर कुणी हात सरसावेल कुणी धक्का देत असेल, त्याच्यात बदलाव करण्याचा प्रयत्न करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल, अशी स्थिती येऊन द्यायची नसेल, तर संविधानाला आज या राजवटीकडून एक संकट येण्याची शक्यता आहे. याची नोंद घेऊन आपण त्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला ठेवणं हे काम उद्याच्या निवडणुकीत करायचंय आणि ते करण्यासाठी एकत्र येण्याचं काम केलं.
१९७७ साली देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षावर टीका टिप्पणी करत होते. इंदिरा गांधीच्यांवर हल्ले करत होते, एकच नेता त्यावेळी उभा राहिला, आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे! – काही लोक मला विचारतात, तुम्ही सगळे एकत्र? तुम्ही या पूर्वी एकमेकांच्या विरुद्ध लढला? म्हटलं हो..! काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचारांना अनेक वर्षापासून काम करतोय. आम्हा सगळ्यांची विचारधारा ही गांधी नेहरूंची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेनं आम्ही काम करतो. लोक विचारतात शिवसेनेचं काय? शिवसेनेचं वैशिष्ट्य हे, की या देशामध्ये कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वानं पहिल्यांदा देशाचा विचार केला. मला आठवतंय १९७७ साली देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षावर टीका टिप्पणी करत होते. इंदिरा गांधीच्यांवर हल्ले करत होते, एकच नेता त्यावेळी उभा राहिला, आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की, हा देश पुढे न्यायचा असेल, या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशातील समस्या कमी करायच्या असतील तर इंदिरा गांधी या करू शकतात आणि इंदिरा गांधींना जाहीरपणाने समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद आहे की, आम्हा दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठीक ठिकाणी उभा राहिला आहे.
बाळासाहेबांचे विचार घेऊन तरूणांची संघटना तुम्ही उभी केली- मी एक गोष्ट सांगतो, उद्धव ठाकरे आम्ही तुमचे कार्यकर्ते हल्ली दररोज बघतो, यापूर्वी तसे बघत नव्हतो. आज मी पहिल्यांदा असं बघितलं की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं आणि प्रश्न महत्त्वाचा लोकांचा असेल तर धावून जाणारा त्याच्या सोडवणुकीसाठी तुमचा शिवसैनिक त्याठिकाणी असतो आणि त्यामुळे मी एक जबरदस्त बाळासाहेबांचे विचार घेऊन तरूणांची संघटना तुम्ही उभी केली. ती सगळी संघटना आज देशावर जे संकट येऊ पाहतंय, त्या संकटांच्या विरुद्ध लढण्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्यामार्फत मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही, ही स्थिती तयार होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे, आणि त्यासाठी तुम्हाला अंतःकरणापासून धन्यवाद देऊ इच्छितो.
घटनेचं समर्थन करणं, त्याचं रक्षण करणं, हे काम आम्ही त्याठिकाणी करणार – आपण इथून पुढं या सगळ्या कामांमध्ये सहभागी होत आहोत. निवडणुका आल्या आहेत, आणि या निवडणुकीमधून राज्यांमध्ये आम्ही लोकांनी स्थापन केलेली ठिकठिकाणी ही जी आघाडी आहे, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत, त्यांना मोठ्या मतांनी विजयी करायचं आहे. त्यांना शक्ती द्यायची आहे आणि ही जबरदस्त शक्ती महाराष्ट्राच्या संसदेमध्ये आपण पाठवू आणि कुणीही या देशाच्या घटनेला की जे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलंय, आणि त्यामुळे अनेक वर्ष हा देश एकसंघ राहू शकला. त्या घटनेचं समर्थन करणं, त्याचं रक्षण करणं, हे काम आम्ही त्याठिकाणी करणार आहोत. हे काम करण्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबाचा आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करणारे बळवंत वानखेडे यांना तुम्ही याठिकाणी विजयी करा. त्यांची खूण ही हात आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या पुढचं बटन दाबा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा, ही विनंती करतो. एक गोष्ट मला सांगायची आहे की, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा संपला आणि जे मतदान झालं ते चिंता करण्यासारखं आहे. नागपूर शहरामध्ये मतदानाची टक्केवारी ५४ टक्के आहे आणि तुम्ही जर बघितलं तर गडचिरोली तिथे ७० टक्के आहे. गडचिरोलीचा आदिवासी ७० टक्के मतदान करतो आणि नागपूरचा सुविद्य माणूस ५४ टक्के मतदान करतो, याचा अर्थ याच्यातून काही शिकलं पाहिजे. आम्हाला वानखेडेंच्या निवडणुकीमध्ये ८० टक्क्यांच्या पुढं अमरावतीचं मतदान पाहिजे ते द्याल, हीच अपेक्षा करतो, असेही पवार म्हणाले.