ताज्या बातम्याराजकारण
Trending

हे मी म्हणत नाही, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलायची: शरद पवार

बारामती, दि. २० – मोदी साहेब बोलताहेत, देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणखी काही नेते बोलत आहेत. या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार, आमच्या विरोधात हा खोटा प्रचार आहे. आम्ही नाही प्रचार केला. केंद्र सरकारचे एक मंत्री आहेत, त्यांचे नाव हेगडे त्यांनी एक भाषण केलं लोकांसमोर या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या. हे मी म्हणत नाही, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय. तो म्हणतोय की घटना बदलायची. आता घटना बदलायचा निकाल घेऊन कोणी राजकारण करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. या घटनेने सर्वांना सारखे अधिकार दिले. तुम्हाला जसे अधिकार आहे मलाही तसेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैशिष्ट्य हे आहे, की समान संधी, समान अधिकार. त्या समान अधिकारावर जे संकट यायलं लागलं आहे, त्यावेळेला आपण सर्वांना जागृत राहणं आणि जे आणतात त्यांना दूर ठेवणं हे काम आपल्याला करायचे आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील कन्हेरी येथे आयोजित सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते केले. पवार म्हणाले, आमचे उमेदवार आणि गेल्या अनेक वर्षांची जी आपली प्रथा आहे की निवडणुकीची सुरुवात आपण कन्हेरीत करतो. हे ठिकाण श्रद्धेचे ठिकाण आहे, अनेकांनी या ठिकाणी सेवा केली. मला आठवतंय, जुने लोक सांगतील, सोनोपंत दांडेकर नावाचे एक गृहस्थ होते. पुण्याला एसपी कॉलेज नावाचा कॉलेज आहे, त्या कॉलेजचे ते प्राचार्य होते. सोनोपंत दांडेकर शिकवण्याचं काम झाल्यानंतर इथे यायचे आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी अंतःकरणामध्ये ठेवले आणि आयुष्यभर जपले त्यांचे नाव काळे बुवा, जुन्या मंडळींना आठवत असेल.

एक काळ असा होता की आजूबाजूला माळरान होतं आणि त्या माळरानामध्ये गवता शिवाय दुसरं काही नसायचं. छोटे मोठे आपण कार्यक्रम हातात घेतले, परवानग्या दिल्या. तुम्हा लोकांनी कष्ट केले आणि आता येताना रस्त्यामध्ये उसाचे परिसर दिसतात.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

या सगळ्या मंडळींनी हनुमान रायाची सेवा केली. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येऊन आपल्या अंतःकरणाची श्रद्धा या ठिकाणी अर्पण करतात. कधी नारळ फोडायला आलो होतो मी?

१९६७ साली पहिल्यांदा, १९७१ साली निवडणूक झाली तेव्हा, १९८०, १९८५, १९९०, १९९५, २००० आत्तापर्यंत इतक्यांदा आलो. मला नाही वाटत नारळ फोडायला एखादा माणूस एखाद्या ठिकाणी इतक्या वेळेला गेला असेल. हे जे मी करू शकलो ती सामान्य जनता आणि हनुमंताची कृपा! त्यामुळे इथून कामाची सुरुवात केल्यानंतर यश हे मिळतच हे अनेक वर्षांचे अनुभव आहे. म्हणून आज मोठ्या आनंदाने तुम्ही सर्वजण इथे आला आहात, तुम्हा सर्वांचे अंतःकरणापासून स्वागत आहे.

निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते. यावेळी ची निवडणूक महत्त्वाची का? आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे. आज काहीतरी देशात वेगळं घडत आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आहे. वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारांवर गदा येईल, संकट येतील. ते होऊ द्यायचे नाही. गेले दहा दिवस मी वाचत आहे,

अमित शाह नावाचे एक गृहस्थ आहेत, ते तडीपार होते. त्यांनी सोलापुरात येऊन भाषण केलं. दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं? त्याचा हिशोब द्या. २०१४ ते २०२४ या कालावधीमध्ये राज्य कोणाचं होतं? मोदींचं. मंत्री कोण होते? हेच होते त्या काळात मी सत्तेत नव्हतो. पण हिशोब मला मागत आहेत. सत्ता यांच्याकडे त्याची आठवण त्यांना नाही. अनेक गोष्टी सांगता येतील शेतीमालाच्या किमती. एक काळ असा होता की सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न उत्तर प्रदेश मध्ये व्हायचे, यंदा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले, कारखाने ठीक चालले, दोन पैसे मिळाले आणि उसाचे पीक लोकांनी घेतले. साखर तयार केली, पिक घेतलं, पण तयार केलेल्या मालाला चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगात पाठवायला पाहिजे. देशाची गरज भागवून माल शिल्लक आहे, निर्यात करण्याची क्षमता आहे, त्याला बंदी, त्याला परवानगी नाही. हा विषय मी स्वतः अनेकदा मांडला.

आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. वसंत दादा पाटील यांच्या नावाने उसाचे संशोधन कारखान्यातल्या समस्या दूर करायला ती संस्था स्थापन केली. या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन करणारा एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो आणि त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. आम्ही सगळे ज्या वेळेपासून दिवसेंदिवस ऊस वाढणार, उसाचे उत्पादन वाढणार नुसती साखर एके साखर करून चालणार नाही. त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या आणि मोटरसायकली त्याच्यावर चालतील असे एक इंधन तयार करणे, त्याच्यापासून वीज तयार करणे आपल्या कारखान्यात त्या गोष्टी होतात. हे सगळं काम करून संशोधन करणारी ही संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चाललंय. पण तयार झालेला माल जगाच्या बाजारपेठेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळणार नाहीत. हे तथ्य सर्व संशोधक सांगतात. पण सरकार परवानगी देत नाही, असेही पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!