ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

हुजूर साहिब नांदेड हजरत निजामुद्दीन हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या चार फेऱ्या मंजूर !

नांदेड, दि. २०- उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हुजूर साहिब नांदेड -हजरत निजामुद्दीन – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या 04 फेऱ्या मंजूर केल्या आहेत.  त्या पुढील प्रमाणे –

1. हुजूर साहिब नांदेड – हजरत निजामुद्दीन विशेष गाडीच्या 02 फेऱ्या : 
गाडी क्रमांक 07621  हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी दिनांक 20 आणि 27 एप्रिल, 2024 ला शनिवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी 08.45 वाजता सुटेल  आणि पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड,  जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झांसी, ग्वालियर, आग्रा, मथुरा मार्गे हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.00 वाजता पोहोचेल.

2. हजरत निजामुद्दीन – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या 02 फेऱ्या : 
गाडी क्रमांक 07622 हजरत निजामुद्दीन ते  हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 21 आणि 28  एप्रिल, 2024 ला रविवारी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून रात्री 21.40 वाजता सुटेल  आणि आलेल्या मार्गानेच हुजूर साहिब नांदेड  येथे मंगळवारी रात्री 00.35 वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 16  डब्बे असतील.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!