तुझ्यामुळेच मी जेलमध्ये गेलो : बलात्कार करून नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी !
छत्रपती संभाजीनगर, दि. १४ – बलात्कार करून फिर्यादी महिलेचा नग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ तयार केला आणि सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तुझ्यामुळेच मी जेलमध्ये गेलो असे म्हणून त्याने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने पोलिसांत दिली आहे.
दिनांक ११ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात ही घटना घडली. फैसल तेजा (वय २५, रा. किलेअर्क, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील महिला फिर्यादी व आरोपी फैसल तेजा हे एकमेकांचे ओळखीचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी फैसल तेजा यास फिर्यादी महिला ही अनुसुचित जमातीची आहे हे माहित असून आरोपी फैसल तेजा याने फिर्यादी महिलेस फोन करून म्हणाला की, तू घराचे बाहेर ये नाहीतर तुझे माझ्याकडे असलेले व्हिडिओ व फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली. फिर्यादी महिलेस टि.व्ही सेंटर परिसरात बोलावले व आरोपी फैसल तेजा याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून हाताचापटाने मारहान केली. त्यानंतर बळजबरीने त्याच्या मोटार सायकलवर बसवून त्याच्या सोबत घरी किलेअर्क येथे घेवून गेला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यानंतर आरोपी हा फिर्यादी महिलेस म्हणाला की, तुझ्यामुळेच मी जेलमध्ये गेलो असे म्हणून फिर्यादी महिलेच्या हातातून तिचा फोन हिसकावून घेतला. त्यानंतर एका रुममध्ये घेवून गेला व फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर बलात्कार करून फिर्यादी महिलेचा नग्न अवस्थेत असलेला व्हिडीओ तयार केला आणि सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची फिर्यादी महिलेस धमकी दिल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनमध्ये 215/2024 कलम 376, 341, 323, 504, 506 भादवीसह कलम 66(ई) आय.टी.अॅक्ट 2000 सह कलम 3(1)(W)(i) अनुसुिचत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.