वैजापूर तालुक्यातील नालेगावच्या युवकाचा चोलामंडलम फायनान्सला गंडा ! दहा कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम जमा केली नाही, बनावट पावत्याही तयार केल्या !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १३ – वैजापूर तालुक्यातील नालेगावच्या युवकाने चोलामंडलम फायनान्सला गंडवले. दहा कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम जमा केली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बनावट पावत्याही त्याने तयार केल्या. एकूण रु.1,94,000/- ची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक वाल्मिक बागुल (वय २८, रा. मु. पो. नालेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात चोलामंडल फायनान्सचे एरिया बिझनेस मॅनेजर हरिष सीताराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील आरोपी अशोक बागुल याने चोलामंडल फायनान्स कंपनीच्या 10 वाहन कर्जदारांकडून रु.2,40,130/- रक्कम वसुल करून त्यापैकी रु.47,130/- एवढीच रक्कम कंपनीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर जमा केली.
बनावट पावत्या तयार करून सदर पावत्या चोलामंडलम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सादर करून रक्कम रु.2,40,130/- जमा केल्याचे भासवून कंपनीची एकूण रु.1,94,000/- ची फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याप्रकरणी चोलामंडल फायनान्सचे एरिया बिझनेस मॅनेजर हरिष सीताराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक वाल्मिक बागुल (वय २८, रा. मु. पो. नालेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि काळे करीत आहे.