क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

केसापुरी ग्रामपंचायत सदस्याची शिपायाला धमकी ! सर्व बॉडी माझ्या ताब्यात, मी तुला नोकरीवरून काढून टाकेन !!

शिपायाच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्यावर दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ – ग्रामपंचायतची सर्व बॉडी माझ्या ताब्यात आहे. तू मला ग्रामपंचायतमध्ये चालत नाही. मी तुला नोकरी करु देणार नाही. मी तुला नोकरीवरुन काढून टाकेल अशी ग्रामपंचायत सदस्याने शिपायाला दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत केसापुरीसमोर दि. १२ एप्रिल रोजी हा प्रकार झाल्याचे फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले आहे.

ज्ञानेश्वर प्रल्हाद पवार (वय ३३, रा. केसापुरी तांडा, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर) असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून त्यांच्यावर दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. यातील फिर्यादी व आरोपी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवार हे एकाच गावातील राहणारे आहेत.

फिर्यादी ग्रुप ग्रामपंचायत केसापुरी येथे शिपाई म्हणून नोकरीस असून, आरोपी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवार हे ग्रुप ग्रांमपचायत केसापुरी येथे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत. फिर्यादी हे ग्रामपंचायतमध्ये साफसफाईचे काम करत असताना आरोपी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवार हे फिर्यादीस म्हणाले की, ग्रामपंचायतची सर्व बॉडी माझ्या ताब्यात आहे. तू मला ग्रामपंचायतमध्ये चालत नाही. मी तुला नोकरी करु देणार नाही, असे आरोपी फिर्यादीला म्हणाले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

त्यावेळी त्याठिकाणी हजर असलेले फिर्यादिचे वडील आरोपीस म्हणाले की, तुम्ही माझ्या मुलाला का त्रास देता. त्यावेळी वाद झाला. मी तुला नोकरीवरुन काढून टाकेल, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास कामी पोलीस उपायुक्त परीमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने सहायक पोलिस आयुक्त महेद्र देशमुख छावणी विभाग यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!