ताज्या बातम्यामराठवाडाराजकारण
Trending

बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर, इच्छूक ज्योती मेटेंना उमेदवारी नाकारली ! भाजपाच्या पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंमध्ये सामना रंगणार !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ४ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेसाठी आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. बजरंग सोनवणेंना बीडमधून उमेदवारी जाहीर झाली असून ज्योती मेटे या बीडमधून इच्छूक होत्या मात्र, राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ज्योती मेटे यांच्या निर्णयाकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये सामना रंगणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. मराठा आरक्षण आणि मराठा उमेदवार हा चर्चेचा आणि टर्निक फॅक्टर ठरणार असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता महाराष्ट्र राज्यातील पक्षाच्या अधिकृत 5 उमेदवारांची पहिली यादी दिनांक 30 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. वर्धा- अमर काळे, दिंडोरी- भास्कर भगरे, बारामती- सुप्रिया सुळे, शिरुर, डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगर- निलेश लंके यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादीने दुसरी यादी जाहीर केली. बीडमधून बजरंग सोणवणे तर भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बीडमधून शिवसंग्रामच्या ज्योती मेटे इच्छूक होत्या. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ज्योती पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!