ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

अंगणवाडी सेविका, महिला वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षिकांनी मतदारांमध्ये जागृती करावी !

आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात मतदार जागृती करावी - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२६ :- ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. शिवाय त्यांचे ग्रामीण भागातील लोकांशी चांगला संवाद असतो. तो धागा पकडून आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

संत एकनाथ रंगमंदिर येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद डॉ.दयानंद मोतीपोवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर वैद्यकीय अधिकारी. पारस मंडलेचा, उपजिल्हाधिकारी. रामदास दौड, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भोकरे. अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला जातो, या लोकशाहीला मजबूत व प्रगल्भ करण्यासाठी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. आरोग्य विभाग हा अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असलेला विभाग असून ग्रामीण भागापर्यंत सेवा देणारा आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदारांमध्ये जाणीव जागृती करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या सांभाळासाठी पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, याची माहिती मतदारांना विशेषतः महिला मतदारांना द्या. महिला मतदारांची संख्या ५० टक्के आहे. महिलांच्या मतदान जाणीव जागृतीत महिला वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे असे आवाहन करण्यात आले.

ग्रामीण भागातील बँकसखी, वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिलांना मतदार जागृतीच्या उपक्रमाची माहिती उपलब्ध करुन द्यावी. मतदार जागृती मध्ये स्वतः सहभाग घ्यावा. नकारात्मकता दूर करून आपल्या कुटुंबातील तसेच आपण कामाच्या ठिकाणी , नातेवाईक, कुटुंब येथे मतदानाला प्रोत्साहन देण्यात यावे. दिव्यांग आणि वृद्ध तसेच लहान मुलांना सोबत घेऊन येणाऱ्या महिला मतदारांनाही आरोग्य विभागामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून मतदान केंद्रावर अधिका अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सोयीस्कर होईल. प्रास्ताविक जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोती पोवळे यांनी तर आभार प्रदर्शन आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले. बैठकीच्या सुरुवातीला एमजीएम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करुन मतदानाचे महत्त्व सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!