ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

एन ६ सिडकोतील अनेक ठिकाणी कचरा उचलणाऱ्या गाड्या नियमित येत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे !

रेड्डी कंपनीवर कारवाई करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गटाचे) मनीष नरवडे यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ -: सिडकोतील एन ६ वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदाने व अनेक गल्ल्यामध्ये टाकाऊ साहित्य व कचरा पडल्याने गलिच्छ झाली आहेत. घंटा गाडी नियमित वेळेवर न आल्याने रहिवाशी मोकळ्या मैदानात ओला व सुका कचरा, खरकटे तसेच टाकावू साहित्य टाकत आहेत. त्यामुळे सिडकोतील मैदानाची दुरावस्था झाली.

मैदानात कचरा, झाडे, व दगड गोठे साचल्याने मुलांना खेळता येत नाही. कचऱ्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे. पर्यायी जागा नसल्याने लहान मुलांना रस्त्यावर किंवा दुर्गंधीचा त्रास सहन करत मैदानात खेळावे लागत आहे. येथील नागरिकांकडून मैदान स्वच्छ व देखभालीची मागणी केली जाते. पण महानगरपालिकेकडून त्याकडे डोळेझाक केली जाते. रेड्डी कंपनीला कचरा संकलन करण्याचे कंत्राट अनेक वर्षांपासून दिले आहे.

कचरा गाड्या घरापर्यंत येऊन कचरा घेऊन जाणार असा नियम असतानाही गाड्या व नियमित वेळेवर येत नाही. जर आल्याच तर सरळ रस्त्याने निघून जातात अन् त्यामुळे नागरिक घरातील कचरा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानावर टाकून निघून जातात. परंतु जेव्हा घरी ये-जा करताना अनेकदा नाक दाबून प्रवास करावा लागतो, त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

औषध फवारणी करणाऱ्याचाही फेरफटका येथे दिसत नाही, त्यामुळे डासाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतो. असे विविध प्रश्न नागरिकांचा पाठलाग सोडत नसल्याची स्थिती ताजी असताना त्यातच रेड्डी कंपनीने आणखी भर घातली आहे. रेड्डी कंपनीचे कर्मचारी अनेकदा कचरा जाळत असल्याने कचऱ्याच्या त्रासासोबतच धुराचे लोंढे परिसरात वाहत असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार होत आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी रेड्डी कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाचे मनीष नरवडे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!