मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना हाताशी धरून मला मारणार ! अशा मरणाला भाग्य लागतं आणि मनोज जरांगे मराठ्यांसाठी मरण पत्करायला तयार !!
संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. खेटा कितीक खेटायचं एकटा पठ्ठ्या तयार- मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ -: देवंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना हाताशी धरून मला मारणार आहे. अरे मी हसत मरतो. पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही. असं मरण यायला भाग्य लागतं आणि मनोज जरांगे मराठ्यांसाठी मरण पत्कराला तयार आहे. संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. खेटा कितीक खेटायचं एकटा पठ्ठ्या तयार आहे, असं आव्हानच मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिले. गृहमंत्री देवंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले.
छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला होता की, शरद पवार यांचे जरांगे पाटील यांना फोन येत होते. दरेकर यांच्या आरोप जरांगे पाटील यांनी फेटाळून लावले. जरांगे म्हणाले की, राज्यातील अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे मदत केलेली नाही.
पत्रकार परिषदेत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माननीय न्यायालयाने सांगितलं की, शांततेत आंदोलन करा. आम्हीही शांततेतच आंदोलन केलं. मात्र, सरकारने दुसर्या दिवशी गुन्हे दाखल केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम एसपी आणि पीआयला सांगून गुन्हे दाखल करायला लावले. त्यानंतर म्हणाले, गुन्हे मागे घेतो मात्र अद्याप गुन्हे मागे घेतलेले नाही. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करतो म्हणाले, मात्र अद्याप अंमलबजावणी केली नाही.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
मला गुंतवण्याचे प्लॅन सुरु झाले. मी ओळखलं. इथं बसण्यापेक्षा तिथंच (सागर बंगला) येतो. गुंतवा मला. परंतू निष्ठा मी विकू शकत नाही. माय बाप मराठ्यांनों त्यांच सरळ म्हणनं आहे की, दहा टक्के आरक्षण यांनी स्वीकारावं. तरच समाज आपल्या बाजूनं होईल, असं त्यांचं म्हणनं आहे. तरच सत्ता येती. तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठा समाजाला फसवू का मी ? त्यांना माहिती आहे, की हा निष्ठावंत आहे. हा बदलूच शकत नाही. याचा गेम करा. म्हणून बैठक घेवून सांगितलं मराठा समाजाला की हे गेम करणार आहेत. गेमला मी घाबरत नाही.
असलं मरण येणं लई भाग्य लागतं. आणि देवंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणार आहे. अरे मी हसत मरतो. पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही. असं मरण यायला भाग्य लागतं आणि मनोज जरांगे मराठ्यांसाठी मरण पत्कराला तयार आहे. संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. खेटा कितीक खेटायचं एकटा पठ्ठ्या तयार आहे.