माजलगावचा जलसंपदा विभागातील कारकून लाच घेताना पकडला, वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३ हजार घेतले !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २३- माजलगावचा जलसंपदा विभागातील कारकून लाच घेताना पकडला. वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई दिनांक 23/02/2024 रोजी मोरेश्वर टी हाऊस समोर रोड वर, फुले पिंपळगाव चौक, केसापुरी कॅम्प, माजलगाव येथे करण्यात आली.
शेख वसीम शेख शाफिक (वय -33 वर्ष, व्यवसाय नोकरी, दप्तर कारकून, (वर्ग -3) उप विभागीय अधिकारी, शेतचारी अस्तरीकरण उप विभाग क्र 10, (जलसंपदा विभाग) माजलगाव जि. बीड मूळ रा.रामेश्वर प्लॉट, शालिमार फंक्शन हॉल जवळ, परभणी जि.परभणी ह.मु.चांदणी ग्राउंड, तांबोळी यांचे घर, माजलगाव) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे मोठेवाडी ता.माजलगाव गट न. 277 मध्ये शेत आहे. सदरच्या शेताचे अनकमांड प्रमाणपत्र (महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीरी करिता नाहरकत प्रमाणपत्र) मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावरून तक्रारदार यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पंचासमक्ष 3500/- रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती 3000/- रू. स्वीकारण्याचे मान्य करून 3000/- रू. पंचासमक्ष स्वतः लाच स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले व ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि .बीड, पर्यवेक्षण अधिकारी – शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.बीड, सापळा पथक:- भरत गारदे, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे ला. प्र. वि.बीड यांनी पार पाडली.