ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

टाऊन हॉल, जुबली पार्क, मिल कॉर्नर व भडकल गेट परिसरातील अतिक्रमण काढले !

झोन क्रमांक १ मध्ये महानगरपालिकेची कारवाई

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ – महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागमार्फत आज टाऊन हॉल जुबली पार्क मिल कॉर्नर व भडकल गेट या परिसरातील रस्त्यावरचे सर्व प्रकारचे अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये दोन टपऱ्या व रस्त्यावर उभी असलेली दोन वाहने काढण्यात आली.

जुबली पार्क भडकल गेट येथे वाहने विक्री व्यवसाय करणारे व्यापाऱ्यांनी रस्त्यावर आपली वाहने उभी करून होता व वाहन विक्री व्यवसाय सुरू केला होता. त्यांना यापूर्वी सूचना दिल्या होत्या तरी देखील त्यांनी अतिक्रमण काढले नाही म्हणून आज हे सर्व गाड्या त्यांच्यासमोर काढण्यात आल्या.

मिल कॉर्नर येथील बस स्टॉप जवळील फळ विक्रेते यांचे अतिक्रमणे हटवून याच रस्त्यावर पुढे बारा पूला गेटपर्यंत डावी आणि उजवी बाजू ला असलेल्या सर्व टपऱ्या काढून रस्ता मोकळा करण्यात आला. बारा पूला गेट येथे एका व्यक्तीने मनपाच्या फुटपाथवर दहा बाय दहा या आकाराच्या जागेत पत्र्याचे शेड करून नान रोटी विक्री सुरू केले होते. सदर शेड निष्कर्षित करून साहित्य जमा करून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या व उप आयुक्त मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर,अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद,अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!