ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

बाबा पेट्रोल पंप चौकातील १३ दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त ! हॉटेल्स व ट्रॅव्हल्सच्या कार्यालयांवर मनपाचा जेसीबी फिरला !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ६ – महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) परिसरातील डाव्या बाजूचे रस्ता बाधित अनधिकृत दुकानांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने सध्या शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत आहे. यामुळे काही प्रसंगी वाहतूक जाम होऊन रुग्णवाहिकेस किंवा व्हीआयपी इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ता राहत नाही. या अनुषंगाने नगर नाकाकडून शहरात दाखल होणाऱ्या महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंप च्या डाव्या बाजूच्या एकूण ११ दुकानाविरुद्ध आज कारवाई करण्यात आली.

या अनधिकृत दुकानामध्ये हॉटेल, ट्रॅव्हल्स च्या दुकानांचा समावेश आहे. या ठिकाणी ट्रॅव्हल्स चे व्यवसाय करणारे दुकाने असल्याने सदर ठिकाणी नेहमी प्रचंड गर्दी व्हायची आणि यामुळे वाहतुक कोंडी होत होती. यात भर म्हणून ऑटो रिक्षा डाव्या बाजूने उभे राहत होते.
संबंधित रस्ता बाधित दुकाने काढण्यासाठी नियमांनुसार महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती. संबंधित अतिक्रमण धारकांनी नोटीस चे उत्तर समाधानकारक खुलासा केला नसल्यामुळे व बांधकाम परवानगी नसल्याने ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक  यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

याबाबत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलीस उपायुक्त नांदेडकर यांच्यासमवेत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी शहरातील प्रत्येक चौकाचे सर्वेक्षण करून ही कारवाई प्रस्तावित केली आहे. या ठिकाणी सदरील दुकानदारांनी सुरुवातीला विरोध केला मात्र त्यांना जसं समजलं आपल्याला नोटीस आलेली आहे आणि आपला खुलासा अमान्य झालेला आहे त्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून जागामालकाने व दुकानदाराने प्रशासनाकडे आपले सामान काढून घेण्याची तीन तासांची विनंती केली होती.

या करिता प्रशासनाने त्यांना वेळ दिली व त्यावेळी त्यांनी हे सर्व सामान व अनधिकृत बांधकामे स्वतः काढून घेतले. डावीकडील रस्ता आता पूर्ण मोकळा झाला आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाचे व वाहतूक शाखेचे अभिनंदन केले आहे. सिडको एन ७ कार्यालय व अन्न व नागरी पुरवठा या कार्यालयाच्या आजूबाजूस असलेल्या अतिक्रमणास सिडको चे अधिकारी यांच्या समवेत मार्किंग करण्यात आली आहे.

सदर अतिक्रमणावर येत्या मंगळवार पर्यंत कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंगेश देवरे ,सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,शेख युनूस, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी आणि क्रांती चौक पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!