क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

झाल्टा फाटा शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, अंधारात सैरावैरा पळणाऱ्या १३ जणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ६-  पोलीस ठाणे चिकलठाणा हद्यीतील झाल्टा फाटा शिवारातील शेतात पत्रा शेड मधील सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. 13 आरोर्षीच्या ताब्यातून 14,51,440/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांना दिनांक 05/4/2024 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, पोलिस ठाणे चिकलठाणा हद्यीतील झाल्टा फाटा शिवारातील गोल्डन इन या हॉटेलच्या पाठीमागील अरविंद बेळगे यांच्या शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये छुप्यापध्दतीने काही व्यक्ती हे पत्यावर तिर्रट व झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.

यावरून पूजा नागरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पथकांसह कारवाईच्या अनुषंगाने पोलीस पथकासह शेताच्या संपूर्ण परिसराची बारकाईने व छुप्यापध्दतीने पाहणी केली असता तेथे एक पत्राचे शेडमध्ये काही व्यक्तींची संशयित हालचाल नजरेस पडली. यावरून सापळा लावून छापा मारण्याचे नियोजन केले. पोलिसांच्या पथकांनी अंदाजे 21:30 वाजेच्या सुमारास रात्रीच्या अंधारात पथकांने लपत छपत जावून अचानक शेतातील पत्र्याच्या शेडला घेराव टाकून छापा टाकला.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

काही जण हे पत्यावर तिर्रट व झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना दिसून आले. पोलीसांनी अचानक झडप घालून कारवाई केल्याने जुगारी व्यक्तींची धांदल उडाली व यातील काही जण हे मिळेल त्या रस्त्याने सैरावैर पळत सुटले. पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत 13 जुगारी व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

१) शेख गुलाब शेख हमीद वय ४६ वर्षे रा. खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर २) लक्ष्मण राधाकिसन रिठे वय ४३ वर्षे रा. आडुळ ३) विष्णू बळंवत गायकवाड वय ४२ वर्षे रा. बेगमपुरा ४) गंगाधर काकुजी तौर वय ५० वर्षे रा. गुरुदत्त नगर ५) अविनाश श्रीमंत सरग वय ३२ वर्षे रा. आडुळ ६) हरिचंद्र भिंगाजी भंडारे वय ४९ वर्षे रा. पडेगाव ७) नाना आसाराम नवपुते वय ४५ वर्षे रा. चिकलठाणा ८) चंदन शांतिलाल पहाडिया वय ४६ वर्षे रा. चेलीपुरा ९) योगेश रामकिसन पिठोरे वय ३२ वर्षे रा. चेलीपुरा १०) पियुष बबन आघाडे वय २७ वर्षे रा. चेलीपुरा ११) संतोष दिंगबर शिंदे वय ४६ वर्षे रा. बेगमपुरा १२) अतिष कचरू गायकवाड वय २३ वर्षे रा. पहाडसिंगपुरा १३) अरविंद बेळगे रा. झाल्टा फाटा सर्व रा. छत्रपती संभाजीनगर शहर परिसर.

या कारवाईमध्ये रोख 36,640/- रुपयांसह 1 चारचाकी वाहन, 13 मोबाईल फोन, 104 पत्त्याचे कॅट, इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 14,51,440/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीविरुध्द पोलीस ठाणे चिकलठाणा येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे चिकलठाणा हे करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा नागरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, पोउपनि सतिष पंडीत पोलीस अंमलदार गणेश मुळे, गजानन चंदिले, सचिन रत्नपारखे, प्रशांत हंटेतार यांनी केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!