ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending

खासदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांना ललकारले ! म्हणाले हे काय कुठले राजे आहेत का ? का येत नाही ठेवीदार आंदोलकांना भेटायला ? मंत्रालयातले सचिव येतात आणि हे एसी कॅबिनमध्ये बसतात !!

जनतेच्या पैशांवर ३४० किलोमीटरची स्पेशल विमानवारी करून वाशीच्या आंदोलनस्थळी जाणारे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दारातल्या गरीब ठेवीदार आंदोलकाना दिवसभर थंडीत ताटकळत ठेवल्याच्या ठेवीदारांच्या तीव्र भावना

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० -: खासदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांना ललकारले. खासदार म्हणाले हे काय कुठले राजा आहे का ? का येत नाही आंदोलकांना भेटायला ? मंत्रालयातले सचिव येतात आणि हे एसी कॅबिनमध्ये बसतात, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला. दरम्यान, जनतेच्या पैशांवर ३४० किलोमीटरची स्पेशल विमानवारी करून वाशीच्या आंदोलनस्थळी जाणारे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दारातल्या गरीब ठेवीदार आंदोलकाना दिवसभर थंडीत ताटकळून  ठेवीदारांच्या तीव्र भावना ठेवीदारांनी व्यक्त केली.

सर्वसामान्य ठेवीदारांच्या हजारो कोटींच्या ठेवी गिळंकृत करणार्या घोटाळेबाजांवर कारवाई करा व ठेवीदारांचे पैसे तातडीने द्या या मागणीसाठी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, अजिंठा अर्बन बॅंक, मलकापूर, ज्ञानोबा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले. सुरुवातीला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर अगदी समोर सुभेदारीच्या गेटसमोर आंदोलन सुरु होते. परंतू आंदलकांचे निवेदन व लेखी आश्वासन देण्यास विभागीय आयुक्त न आल्याने आंदोलक संतापले. सर्व आंदोलक हे विभागीय आयुक्त कार्यालयावर चालून गेले. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाचे गेट लावण्यात आले. पोलिस बंदोबस्तही तगडा होता. गेटवर चढून आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयात घुसले. यामुळे आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठी, काठीच काय आमच्यावर गोळ्याही झाडल्या तर या गरिबांना न्याय देण्यासाठी गोळ्या छातीवर घेण्यीच तयारी आहे मात्र, प्रशासनाकडून पेसे देण्याच्या तारखेचे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

आज सकाळपासून सुरु झालेल्या आंदोलन सायंकाळच्या सुमारास आक्रमक झाले. विभागीय आयुक्त यांनी लेखी आश्वासन द्यावे, या मागणीवर ठेवीदार ठाम होते. शिष्टमंडळाला मी कार्यालयात भेटायला तयार असल्याचा निरोप आयुक्तांनी आंदोलकांना दिला मात्र, सर्व ठेवीदारांसमोर लेखी आश्वासन द्या या मागणीवर ठेवीदार ठाम होते. दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांना संबोधीत करताना विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्यावर तोफ डागली. विभागीय आयुक्तांचा उल्लेख करून खासदार  इम्तियाज जलील म्हणाले की, त्यांचं म्हणन आहे डेलीगेशन. विभागीय आयुक्त साहेब, मी शिकलेला खासदार आहे. मला सगळं कळतं.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तुम्ही समजत असाल की १७ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना येथे बोलावून तुम्ही एसी कॅबिनमध्ये बसणार असेल… विभागीय आयुक्त साहेब पाच मिनीटांचा टाईम देतो आपल्याला नाहीतर पूर्ण लोक तुमच्या कॅबिनमध्ये येतील आणि  त्यापुढील सगळी जबाबदारी तुमची असणार आहे. हे सगळं रेकॉर्ड करा माझं संभाषण… होय मी इम्तियाज जलील बोलतोय. तुम्हाला सगळे नियम माहिती असेल तर मलाही सगळे नियम माहित आहे. मंत्रालयातले सचिव बाहेत येतात लोकांना (आंदोलकांना) बोलायला. हे डिव्हिजनल कमीशनर (विभागीय आयुक्त) राजा आहेत का ? का येत नाही ? घ्या माझा व्हिडियो घ्या तुम्ही मी बोलतो. पाच मिनिटांत तुम्ही जर आला नाहीत तर करा तुमची फोर्स तयार. जर हे लोक आतमध्ये आले तर त्याची सर्व जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. (यानंतर खासदारांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. बसा… खाली बसा…) सायंकाळ ७.३० वाजेपर्यंत सर्व आंदोलक थंडीत कुडकुडत विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ठिय्या देत होते.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व सुरुवातीपासून गरीब ठेवीदारांचे नेतृत्व करणारे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार अशी भूमीका आंदोलकांनी घेतली. दरम्यान, आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात घुसले. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी गरीब ठेविदारांचा आवाज बनून प्रशासनाला जाब विचारला. खासदार इम्तियाज जलील यांनी मांडलेली सविस्तर भूमीका खालील व्हिडियोत पहा…

आदर्श नागरी पतसंस्था, रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, देवळाई महिला, मलकापूर अर्बनसह महाराष्ट्रात कमीत कमी २००० कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली  – आदर्श नागरी पतसंस्था, रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, देवळाई महिला, मलकापूर अर्बनच्या घोटाळ्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी यापूर्वीही संसदेत जोरदार मुद्दा उचलला होता. कमीत कमी २००० कोटींच्या या घोटाळ्यात आरबीआयने इंटरविन करून सहकार डिपार्डमेंटला सहा महिन्यांत सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

सहकारी पतसंस्था व सहकारी बँकाच्या घोटाळ्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत आवाज उचलून लक्ष वेधले होते की,देशभरात लाखों ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची दररोज कशी लूट केली जाते याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील काही सहकारी संस्थांबद्दल सांगायचे आहे. या सहकारी पतसंस्थांनी मिळून सर्वसामान्य ठेवीदारांच्या किमान 2000 कोटी रुपयांच्या ठेवी घेऊन फरार झाले. आदर्श नागरी पतसंस्थेचे 62000 ठेवीदार आहेत. रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, 80 टक्के ठेवीदार जे माजी सैनिक आहे. ज्यांनी आपले पैसे अशा सहकारी पतसंस्थांत गुंतवले. सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये गुंतवले.

देवळाई महिला, मलकापूर अर्बन, अमरावतीची अनुग्रह, मुंबईतील नागरी पतसंस्था आदींनी मिळून किमान 2000 हजार कोटी रुपये बुडवले. अध्यक्ष मोहदय या सहकारी पतसंस्थांवर RBI किंवा सहकार खात्याचे कोणतेही नियंत्रण नाही. आदर्श नागरी पतसंस्था माझ्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघात येते. 62000 ठेवीदार आहेत. अशा काही महिला आहेत ज्यांची आयुष्यभराची कमाई ₹ 200000 आहे. त्यांनी अशा पतसंस्थेत ₹200000 गुंतवले कारण तेथे व्याजदर जास्त आहे.

लालूच दाखवून लोकांच्या पीएफचे पैसे घेतले जातात. कोणी निवृत्त होत असेल तर त्याच्या निवृत्तीचे पैसे घेतले जातात. आणि हे पैसे घेतल्यानंतर सुरुवातीला ते त्यांना चांगला परतावा देतात. मात्र नंतर ते पैसे घेवून पळून जातात. मी स्वतः सरकारला विनंती करू इच्छितो की RBI ने अशा सहकारी संस्थांमध्ये त्वरित इंटरविन करावे आणि सहकार खात्याला सक्त सूचना द्याव्यात की सहा महिन्यांत सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे परत करावेत, अशी जोरदार मागणीही खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली होती.

अजिंठा अर्बन बँक : प्रथम माहिती अहवालानुसार ९७.४१ कोटींचा घोटाळा- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिले. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली असल्याचे सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून ३६ कर्जदारांना विनातरण कर्ज वाटप केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्जाचे वाटप- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा काकडे यांनी उघडकीस आणला आहे. असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्ज वाटप केल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें यांच्यासह त्या काळातील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें या दोघांना सुरुवातीला अटक केलेली आहे. त्यानंतर उस्मानपुरा, जाधवमंडी येथील दोन शाखा व्यवस्थापकासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य सूत्रधार चेअरमन सुभाष झांबड हे अद्याप फरार आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!