ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending

महाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे शनिवार व रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन !

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४६ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवार व रविवार १७ व १८ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रेनडेवसमध्ये होत आहे. अधिवेशनास महाराष्ट्रभरातून महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्रधारी कंपनीतील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनास महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अविनाश हावरे, मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे, महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना ही महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य शासकीय कंपन्यातील वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती व तंत्रज्ञान, सुरक्षा व अंमलबजावणी, जनसंपर्क व विधी विभागातील अतांत्रिक अधिकाऱ्यांची नेतृत्व करणारी संघटना आहे. संघटनेच्या ४६ व्या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांची सद्य:स्थिती, आव्हाने व सक्षमीकरण यावर विचारमंथन होणार आहे, असे संघटनेचे हंगामी अध्यक्ष तुषार खैरनार, सरचिटणीस संजय खाडे, संघटन सचिव प्रवीण काटोले आणि केंद्रीय कार्यकारिणीने सांगितले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपसरचिटणीस प्रणेश सिरसाठ, परिमंडल अध्यक्ष सुनील पावडे, सचिव गणेश बोढरे, महिला प्रतिनिधी मंजुषा दुसाने व सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत. अधिवेशनास सर्व सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!