ताज्या बातम्यामराठवाडा
सव्वा किलोमीटर लांबीचा हानिकारक मांजा जप्त ! छत्रपती संभाजीनगर शहरातील ७३ दुकानांची कसून तपासणी !!
छत्रपती संभाजीनगर, दि.१२ – सव्वा किलोमीटर लांबीचा हानिकारक मांजा जप्त जप्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील ७३ दुकानांची तपासणी दरम्यान हा हानीकारक मांजा आढळून आला. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी हानिकारक मांजा विक्रेत्यांविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
आज कैलास नगर, सिल्क मील कॉलनी व बुधीं लाईन येथे ७३ दुकानांची तपासणी करण्यात येऊन तीन दुकानांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदरील दुकानदारांकडे अंदाजे १३५० मीटर हानिकारक मांजा आढळून आला. त्यांच्या कडून ३५०० रु दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व त्यांच्या पथकाने पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe